Mumbai News : मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली?, 'हे' आहे कारण; CM म्हणाले...

mumbai air pollution
mumbai air pollutionesakal
Updated on

मुंबईः मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी होईल, असा विश्वास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक यंत्रणा आणि अधिक मनुष्यबळ वापरा, दिवसाआड रस्ते चकाचक धुऊन काढा, आवश्यकता भासल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. पालिकेने केलेल्या कामाचा शिंदे यांनी आज पहाटे पाच वाजता आयुक्तांसोबत आढावा घेतला.

मुख्य रस्ते व वसाहतींमधील रस्ते आधुनिक यंत्रणा, अधिकचे मनुष्यबळ आणि भाडेतत्त्वावरील एक हजार टँकरमधील पाण्याचा वापर करून एक दिवसआड धुऊन काढा. मेट्रो, बुलेट ट्रेन, पूल उभारणी आदी विकासकामांच्या ठिकाणी फॉगर मशीन, स्प्रिंकलर आदींचा वापर करा, असे आदेश शिंदे यांनी दिले.

mumbai air pollution
Generic Medicine : राज्यात जेनेरिक औषधांच्या ३९३ दुकानांसाठी केंद्राची परवानगी

न्यायालयाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिल्यानंतर पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी यंत्रणा प्रदूषण नियंत्रणासाठी कामाला लावली आहे. पालिकेने केलेल्या कामाचा मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पहाटे पाच वाजता आढावा घेतला. पश्चिम उपनगरातील कलानगर जंक्शन, मिलन सब-वे, टर्नर रोड, जॉगर्स पार्क आदी परिसरास भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाच्या आणि स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. यापुढे प्रत्येक विभागात भेट देऊन पालिकेकडून करण्यात येत असलेल्या स्वच्छता कामांची पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पालिकेचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

मुंबईतील मुख्य रस्ते व मोठ्या वसाहतींमधील रस्ते अगोदर धूळ हटवून नंतर टँकरमधील पाण्याचा वापर करून स्वच्छ करा, असे त्यांनी सांगितले. हवेतील धूलीकण कमी करण्यासाठी शहरात ४० ठिकाणी वॉटर फॉगर आणि स्मॉग गन लावण्यात आल्या आहेत.

mumbai air pollution
Nashik Breaking: संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त! अंकुश शिंदे यांची तडकाफडकी बदली

येथेही उपाययोजना करा

मुंबईत मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेनची कामेही सुरू आहेत. तसेच पुलांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी निर्माण होणारे धुळीचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिका, शासकीय यंत्रणा आणि विकसक यांनी उपाययोजना करावी. ग्रीन कव्हर लावा. स्प्रिंकलरचा वापर करा. त्यामुळे धुळीवर नियंत्रण येईल व प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.