Mumbai Pollution: आदित्य ठाकरेंमुळेच वाढलय मुंबईचे प्रदूषण; आशिष शेलारांचा आरोप

Mumbai Pollution
Mumbai Pollutionsakal
Updated on

Mumbai Pollution: तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कागदावर ‘आरे’ला जंगल म्हणून घोषित केले. प्रत्यक्षात मुंबईत विकसकांना ‍प्रीमियमची खैरात करून सिमेंट काँक्रीटचे जंगल उभे केले. त्याचे परिणाम आता मुंबईकरांना भोगावे लागत असल्याची टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी आज केली.

Mumbai Pollution
Aditya Thackeray : माझ्या नावात 'बाळ' लावलं याचा अभिमान; आदित्य ठाकरेंचं 'आदू बाळ' म्हणणाऱ्या शेलारांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबईतील हवेतील प्रदषूणाला तत्कालिन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप शेलार यांनी केला. ठाकरे गटाकडून मुंबईत बिल्डरांसाठी गेल्या १० वर्षांत सुमारे ३८ हजार ९९९ झाडांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात आली.

प्रीमियमची खैरात वाटल्यामुळे मुंबईत एकाच वेळी ६ हजार बांधकाम प्रकल्प सुरू झाले. मेट्रो आणि तिच्या कारशेडचे काम ठाकरे गटाने रोखून ठेवले, असेही शेलार म्हणाले. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सरकारने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेल्या १४ हजार कोटींच्या दंडात सवलत देऊन तो ३०० कोटींवर आणला आणि त्यालाही स्थगिती दिली, असा आरोपही शेलार यांनी केला.

Mumbai Pollution
Aditya Thackeray News : असंवेदनशील सरकारला जाब विचारणार : आदित्य ठाकरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.