Mumbai Prabhadevi: धनुष्यबाण चिन्ह हटवलं! मुंबईतील प्रभादेवीत शिंदे गट-ठाकरे गट आमने सामने, तुफाण राडा...नेमकं काय घडलं?

Mumbai Prabhadevi Controversy: शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर माहिम पोलिस ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी शैलेश माळी, अमर लब्देसह अन्य एकावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Mumbai Prabhadevi news
Mumbai Prabhadevi newsesakal
Updated on

मुंबई: प्रभादेवी परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. रस्त्याच्या होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंच्या पदाधिकार्यांनी रात्रीच्या वेळेस काढल्यामुळे स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाले.

फुटपाथवरील होर्डिंग वाद-

स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी स्वखर्चातून बसवलेले बोर्ड ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी हटवले, असा आरोप शिवसेना पदाधिकार्यांनी केला आहे. सत्तांतरानंतर, ठाकरे गटाचे पदाधिकारी या होर्डिंगवर इतर राजकीय पक्षाचे संदेश लावत होते. यावर शिवसेना पदाधिकार्यांनी आधीच आक्षेप घेतला होता आणि स्थानिक पोलिसांना पत्र व्यवहाराद्वारे ही बाब निदर्शनास आणून दिली होती.

मंगळवारी रात्रीचा वाद-

मंगळवारी रात्री ठाकरेंचे पदाधिकारी आहुजा टॉवर येथील शिवसेना पक्षाच्या होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह कापून हटवत होते. यावेळी शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी ठाकरेंच्या पदाधिकार्यांमध्ये वाद निर्माण केला.

Mumbai Prabhadevi news
Supreme Court : आमदार अपात्रता सुनावणी ऑक्टोबरपर्यंत लांबणार ? शिवसेना व ‘राष्ट्रवादी’च्या पक्ष व चिन्हावरही निर्णयाची शक्यता

पोलिसांत तक्रार दाखल-

शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर माहिम पोलिस ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी शैलेश माळी, अमर लब्देसह अन्य एकावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदा सरवणकर यांनी फुटवरील बोर्ड स्वखर्चातून बसवण्यात आल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

स्थानिक पोलिसांचा हस्तक्षेप-

या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केला असून, या बाबतीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्र व्यवहाराद्वारे ही बाब पोलिसांना निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती मिळत आहे.

प्रभादेवी परिसरात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Mumbai Prabhadevi news
मुंबईतील 36 जागांसाठी मारामारी का? शेवटी स्वबळावर लढणार पण? ठाकरे 25, पवार गट 6, काँग्रेसचा 15 जागांवर दावा, गणित कसं जुळणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.