मुंबई - मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये नमाज पठणाचा आग्रह धरु नये, त्याऐवजी घरीच नमाज पठण करावे, असा सल्ला मुस्लिम डॉक्टर्सनी समाजातील नागरिकांना दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने जुमा मशीद बॉम्बे ट्रस्टची सामूहिक नमाज पठणाची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. त्यांनी मशिदीमध्ये नमाज पठणाची परवानगी मागितली होती. पण सध्याच्या कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने जुमा मशीद बॉम्बे ट्रस्टची याचिका फेटाळून लावली.
"सध्या कोरोनाची त्सुनामी आली आहे. त्यामुळे आपण आपल्या घरातच नमाज पठण केले पाहिजे. सोसायटीत इमारतीच्या आवारात सामूहिक नमाज पठण टाळले पाहिजे. कारण कोरोनाचा वाहक कोण आहे?, कोण सुपर स्प्रेडर आहे? ते आपल्याला ठाऊक नाही" असे डॉ. अल्तामाश शेख म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
नमाज पठण आवश्यकच आहे. पण त्याचवेळी डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, सतत हात धुणे सुद्धा आवश्यक आहे, तरच आपण स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचवू शकतो. धार्मिक विधी अधिकार असून ते महत्त्वाचे आहे. पण त्याचवेळी कोविड-१९ च्या काळात नागरिकांची सुरक्षितता सुद्धा महत्त्वाची आहे. "रमजानच्या या काळात मी माझ्या मुस्लिम बांधवांना मशिदीमध्ये जाऊन नमाज पठण टाळण्याचा सल्ला देईन" असे डॉ. वसिम घोरी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.