मुंबई : मुंबईतील (mumbai) एका खासगी रुग्णालयात (private school) अद्ययावत बोन मॅरो प्रत्यारोपण (Bone Marrow Transplant) विभाग सुरू करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल (iqbal singh chahal) व फोर्टिस रुग्णालयाचे (fortis hospital) एमडी आणि सीईओ डॉ. आशुतोष रघुवंशी आणि झोनल डायरेक्टर डॉ. एस. नारायणी यांच्या हस्ते या विभागाचे उद्घाटन झाले.
डॉ. शुभप्रकाश सन्याल यांच्या नेतृत्वाखाली या बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट (बीएमटी) विभागाचे कामकाज चालणार असून, त्यात अद्ययावत तंत्रज्ञान आणि पायाभूत सोयीसुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या विभागामध्ये सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या रक्तविकारांसह जन्मजात बोन मॅरो निकामी असल्याने उद्भवणारे आजार, थॅलसेमिया, सिकल सेल अॅनिमिया, रोगप्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे निर्माण होणारे आजार, मल्टीपल मायलोमास, ल्युकेमिया आणि प्रगत टप्प्यावर पोहोचलेल्या अर्बुदांच्या अनेक प्रकारांसारख्या रक्ताच्या प्राणघातक कर्करोगांवरील उपचारांचा समावेश असणार आहे.
" बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट ही एक स्पेश्यलाइझ्ड उपचारपद्धती आहे आणि अशा रुग्णांकडे खास लक्ष देण्याची व त्यांची विशेष देखभाल राखण्याची गरज असते हे आम्ही जाणतो. म्हणूनच या उपचारांच्या बाबतीत जागतिक मापदंड ठरतील असे परिणाम मिळवण्याच्या हेतूने हे अत्यंत प्रगत असे युनिट उभारण्यात आले आहे , असे मुंबईच्या झोनल डायरेक्टर डॉ. एस नारायणी म्हणाल्या."
काय आहे बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट?
बीएमटी ही एक प्राणरक्षक प्रक्रिया आहे व रक्ताच्या कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांसाठी हा आजार दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे. या प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या क्षतीग्रस्त बोन मॅरो मूलपेशी (स्टेमसेल्स) काढून घेतल्या जातात व त्याजागी दात्याकडून मिळालेल्या निरोगी स्टेम सेल्सचे प्रत्यारोपण केले जाते. ही प्रक्रिया ऑटोलोगस किंवा अॅलोजिनिक असू शकते. ऑटोलोगस प्रत्यारोपणामध्ये रुग्णाच्या स्वत:च्या रक्तपेशी वापरल्या जातात, तर अॅलोजेनिक प्रत्यारोपणामध्ये रुग्णाशी जुळणा-या दात्याकडून मिळालेल्या पेशींचे प्रत्यारोपण केले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.