Marine Drive : मरीन ड्राईव्हवर पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Marine Drive
Marine DriveSakal
Updated on
Summary

मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुंबई - मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. विविध सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा आढावा घेणारा पाहणी दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केला. या परिसरात पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची तसेच उपाययोजनांची माहिती महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी आज कोस्टल रोडचीही पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

मुंबई महानगरात जगभरातून पर्यटक येतात. खासकरून मरीन ड्राईव्ह परिसराला सर्वच पर्यटक हमखास भेट देतात. या पर्यटकांना तसेच या परिसरात विरंगुळा म्हणून भेट देणाऱ्या मुंबईकर नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निरनिराळ्या सोयी-सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला निर्देश दिले. मरीन ड्राईव्ह परिसरातील सी फेसिंग इमारतींना विशिष्ट रंग देण्यात यावा.

तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो याठिकाणी सुरू करावा, असे सांगून सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध सूचना केल्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महिला बालविकास आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा आदि यावेळी उपस्थित होते. कोस्टल रोडचे काम वेगात सुरू आहे. त्या कामाचाही मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी पालिका आयुक्त इक्बाल सिंह त्यांच्या समवेत होते.

पालिका आयुक्त चहल यावेळी म्हणाले की, मरीन ड्राईव्ह मध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यात येत आहे. व्ह्युविंग डेक निर्मिती ही नियोजन विभागाकडून केली जाणार आहे. एकूण ५३ मीटर लांब व ५ मीटर रुंद असा सी साईड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी तसेच समुद्र पाहण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले. मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने (सी फेस) आसन व्यवस्था रचना येत्या काही दिवसात करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल. त्यादृष्टीने कामाला सुरूवात करण्यात येत आहे, असेही आयुक्त चहल यांनी नमूद केले.

एक व्ह्युविंग डेक

यावेळी मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यासोबतच सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिले.

एक किलोमीटर अंतरावर प्रसाधनगृह

मरीन ड्राईव्ह परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट दर्जाचे प्रसाधनगृह उभारण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर, खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने (सीएसआर) दोन प्रसाधनगृह उभारण्यात येतील, याबाबतचे कार्यादेश लवकरच देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.