Mumbai Pune Express Way: गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत १६५ अपघात झाले होते; तर ५६ प्राणांतिक अपघातांमध्ये ६८ लोकांना वाहन अपघातात जीव गमवावा लागला होता. या तुलनेत या वर्षी दहा महिन्यांत एकूण १२६ अपघात झाले असून, ४६ प्राणांतिक अपघातांमध्ये ५७ मृत्यू झाले असून, तब्बल २४ टक्के अपघात आणि १६ टक्के मृत्यूंमध्ये घट झाल्याची माहिती महामार्ग पोलिस विभागाने दिली आहे.
महामार्ग पोलिस विभागाच्या गेल्या चार वर्षांच्या अपघाताच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक अपघात आणि मृत्यू २०१९ मध्ये झाले होते. त्यानंतर हळूहळू अपघात आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली; मात्र गेल्या वर्षी एकूण १९८ अपघात झाले असून, ७३ प्राणांतिक अपघातांमध्ये ९२ लोकांचा वाहन अपघातात मृत्यू झाला होता. शिवाय, गेल्या वर्षी दहा महिन्यांत झालेले अपघात आणि मृत्यूच्या आकडेवारीमध्येही या वर्षी घट दिसून येत आहे.(Mumbi Pune Express Way)
गेल्या वर्षीच्या दहा महिन्यांच्या अपघात आणि मृत्यूसह एकूण प्रकारांमध्ये प्राणांतिक अपघातात १८ टक्के घट झाली आहे. त्याप्रमाणेच मृत्यू १६ टक्के, गंभीर अपघात २३ टक्के, गंभीर जखमींची संख्या १८ टक्के, किरकोळ अपघात ३५ टक्के; तर किरकोळ जखमींची संख्या ७ टक्के आणि कोणतीही जखम न होता झालेल्या अपघातांमध्ये २७ टक्याने घट झाली असल्याची महामार्ग पोलिस विभागाने माहिती दिली आहे.(causes of accidents on indian highway)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.