मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. दरम्यान आता हा प्रवास करणए १ एप्रील २०२३ पासून महागणार आहे, एक तारखेपासून या द्रुतगती मार्गावरून (Mumbai-Pune Expressway) प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी तब्बल १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.
बांधकाम विभागाकडून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याबद्दल २००४ साली अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेनुसार २०२३ मधील टोलवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १ एप्रिल २०२० मध्ये वाढ झाली होती. आता या दरवाढीबद्दल एमएसआरडीसी कडून माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' हा यावर होणाऱ्या सततच्या अपघातामुळे नेहमी चर्चेत असतो, या दोन शहरांना जोडणाऱ्या या महत्वाच्या रस्त्यावर नागरिकांना सतत वाहतुक कोंडीला देखील समोरे जावे लागते. या प्रश्नांची सोडवणूक आवश्यक असाताना या मार्गावर टोल वाढवण्यात येत आहे. आगामी दरवाढ लागू झाल्यानंतर प्रवाशांना तब्बल ५० ते ७० रुपये इतका टोल जास्त द्यावा लागणार आहे.
टोलमध्ये किती रुपयांची वाढ होणार?
नवे दर लागू झाल्यानंतर पुणे-मुंबई प्रवास महागणार आहे, यामध्ये कारचा टोल 270 रुपयांवरून 316 रुपये होणार आहे. तर, बससाठी 795 रुपयांएवजी 940 रुपय द्यावे लागणार आहेत. ट्रकसाठी सध्या 580 रुपये द्यावे लागतात मात्र यापुढे वाहन चालकांना 685 रुपये द्यावे लागतील. तर टेम्पोसाठी 420 रुपयांऐवजी 495 रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे.थ्री एक्सेल साठी १३८० रुपयांएवजी १६३० रुपये तर एम एक्सेलसाठी १८ ३५ रुपयांएवजी २१६५ रुपये मोजावे लागणार आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.