Mumbai News : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आठ पदरी होणार; एमएसआरडीसीने राज्य शासनाला पाठवला प्रस्ताव

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. दैनंदिन होणारे अपघात चिंता वाढवणारे असून वाहतुक कोंडी सुद्धा वाढली
Mumbai-Pune Expressway will eight-lane Proposal sent by MSRDC to State Govt
Mumbai-Pune Expressway will eight-lane Proposal sent by MSRDC to State GovtEsakal
Updated on

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. दैनंदिन होणारे अपघात चिंता वाढवणारे असून वाहतुक कोंडी सुद्धा वाढली आहे. त्यामूळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.त्यावरून एमएसआरडीसीला प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यावरून आता प्रस्ताव सादर केला आहे.

सध्या स्थितीत अवजड वाहनांसाठी तिसरी लेन, कारसाठी दुसरी लेन आणि वेगाने ओव्हरटेक करून पुढे जाण्यासाठी पहिले लेन सध्या मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर आहे. याप्रमाणे दोन्ही बाजून एकूण सहा पदरी द्रुतगती महामार्ग आहे. मात्र, यातही अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू असतात. शिवाय पावसाळ्यात दरळी कोसळण्याचे प्रमाण वाढते. त्यामूळे एक लेन बंद ठेवण्याची वेळ येते.

परिणामी पिक अवर्स मध्ये वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. विकेंड मध्येही मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग पुर्णतहा वाहन कोंडीने व्यापलेला असतो. त्यामूळे याचा फटका सर्वसामान्यांसह सर्वच क्षेत्रातील लोकांना याचा फटका सहन करावा लागतो.

यापुर्वीच मराठी चित्रपट सुष्टीतील अनेकांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाईट अनुभवाचे ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामूळेच आता राज्य सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला असून, वाहतुक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.