मुंबई : रेल्वे मंत्रालय आणि भारतीय रेल्वेद्वारे 'भारत गौरव ट्रेन' सुरू

पर्यटनाला चालना मिळण्यासाठी रेल्वेकडून हा उपक्रम राबविला जात आहे.
ट्रेन
ट्रेनsakal
Updated on

मुंबई : रेल्वे मंत्रालय आणि भारतीय रेल्वेद्वारे 'भारत गौरव ट्रेन' सुरू केली आहे. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी रेल्वेकडून हा उपक्रम राबविला जात आहे. वैयक्तिक, भागीदारी फर्म, कंपनी, सोसायटी, ट्रस्ट, जॉइंट व्हेंचर, कंसोर्टियम, सरकारी एजन्सीसह इच्छुक टूर ऑपरेटरद्वारे भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर 'भारत गौरव ट्रेन्स' अंतर्गत नोंदणी करू शकतात.
कोरोना लाॅकडाऊन काळानंतर भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. तर, प्रवाशांना एतिहासिक, धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी भारत गौरव ट्रेनची संकल्पना मांडण्यात आली आहे.

या गाडीचे डब्बे रेल्वे बोर्डाकडून सेवा प्रदात्याला वाटप केले जातील. नॉन-रेल्वे ग्राहक योजनेअंतर्गत सेवा प्रदाता थेट रेल्वेच्या उत्पादन युनिटमधून डब्बे खरेदी करू शकतात. सेवा प्रदाता या योजनेअंतर्गत २ लगेज कम ब्रेक व्हॅनसह किमान १४ आणि कमाल २० डब्बे निवडू शकतात. सेवा प्रदात्यांना या गाड्यांसाठी व्यवसाय मॉडेल आणि दर ठरवण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यांना ट्रेन ब्रँडिंग अधिकार, नामकरण अधिकार आणि तृतीय पक्ष जाहिरात अधिकार देखील मिळतील. सेवा प्रदान करते सुसज्ज नसलेले डब्यांची देखील निवड करू शकतात आणि त्यांच्या गरजेनुसार सूट, सलून किंवा इतर कोणत्याही विशिष्ट पर्यटकांच्या गरजेनुसार सुसज्ज करू शकतात.

सेवा प्रदात्याने दरवर्षी रेल्वेला 'वापर अधिकार शुल्क' भरावे लागेल, त्याचा प्रकार आणि त्याचे कोडल लाइफ यावर अवलंबून एक निश्चित दर ठरविण्यात आले आहे. तथापि, रेल्वेच्या स्वत:च्या उत्पादन युनिटमधून नॉन- रेल्वे ग्राहकाद्वारे डब्बे खरेदी केले असल्यास, सेवा प्रदात्याने 'वापर अधिकार शुल्क' भरण्याची गरज नसेल. पुनर्विकसित स्थानकासाठी स्टॅबलींग, वाहतूक आणि वापरकर्ता शुल्क यासाठी निश्चित आणि बदलणारे इतर शुल्क लागू आहेत. रेकच्या मागणीसाठी परफॉर्मन्स बँक गॅरंटी स्वरूपात परत करण्यायोग्य सुरक्षा ठेव देखील लागू आहे, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ट्रेन
नागपूर : कृषी समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा

विभागीय रेल्वे स्तरावर मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (प्रवासी सेवा) -नोडल अधिकारी, मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक आणि मुख्य रोलिंग स्टॉक अभियंता (कोचिंग) यांची एक समिती पश्चिम रेल्वेने स्थापन केली आहे. टुरिस्ट सर्किट ट्रेनच्या संचालनाशी संबंधित सर्व विनंत्या/समस्यांवर प्रक्रिया करण्यासाठी नोडल अधिकारी हा संपर्काचा एकल बिंदू असेल. या गाड्यांना मेल/एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे भारतातील आणि जगाच्या लोकांना दाखवण्यासाठी 'भारत गौरव ट्रेन'ची संकल्पना तयार केली आहे. यामुळे लोकांना किफायतशीर खर्चात विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.
- अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.