Mumbai Railway : पश्चिम रेल्वेवर आठ दिवसांचा ब्लॉक, या गाड्यांवर होणार परिणाम

Railway Update: दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेस ५० मिनिटे आणि मुंबई सेंट्रल-बरौनी स्पेशल ३० मिनिटे विलंबाने धावणार आहे.
Mumbai Railway : पश्चिम रेल्वेवर आठ दिवसांचा ब्लॉक, या गाड्यांवर होणार परिणाम
Updated on

Latest Railway News: पश्चिम रेल्वेच्या उडवाडा-वापी स्थानकांदरम्यान रोड ओव्हर पुलाच्या बांधकामासाठी आठ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकच्‍या पहिल्या टप्प्यात सोमवारी (ता.२१) व मंगळवारी (ता.२२) तसेच गुरुवारी (ता.२४) ऑक्टोबर आणि ११ नोव्हेंबरला अप आणि डाउन मार्गावरील काही गाड्या रद्द राहणार आहेत.


ब्लॉक कालावधीत ट्रेन क्रमांक २०९०८/२०९०७ भुज-दादर सयाजीनगरी एक्स्प्रेस ३ नोव्हेंबर रोजी भुजहून आणि ४ नोव्हेंबरला दादरहून वलसाडपर्यंत धावेल आणि वलसाड आणि दादर दरम्यान अंशतःरद्द राहील. तर, ४ नोव्हेंबरची ट्रेन क्रमांक ०९१५४ /०९१५३ वलसाड-उमरगाम रोड ईएमयु स्पेशल रद्द राहील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.