लसीचा डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास खुला करा, कर्नाटक पॅटर्न मुंबईत राबवा

प्रवासी संघटनेची मागणी.
Mumbai train
Mumbai trainSakal Media
Updated on

मुंबई : कर्नाटक सरकारने (Karnatak Government) वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीची पावले उचलली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून रेल्वेने ( Maharashtra Railway) कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना लसीचा एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र (Corona Vaccination Certificate) घेऊन प्रवास करण्याचे अनिवार्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या मुंबईकरांनी कोरोना लसीचा डोस घेतला आहे, त्यांना उपनगरीय लोकलमधून (Mumbai train Journey) प्रवास करण्याची मुभा देऊन कर्नाटक पॅटर्न मुंबईत राबविण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने केली आहे. ( Mumbai railway start like karnatak government pattern demand by Railway travelling union)

कर्नाटक राज्य सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. रेल्वे मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या 72 तासांच्या आत घेतलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत घेऊनच प्रवास करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. 72 तासांपेक्षा अधिक तासांचा आरटी-पीसीआर चाचणी अहवाल नसावा. किंवा, कोरोना लसीचा कमीतकमी एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असलेल्या प्रवाशांना महाराष्ट्र ते कर्नाटक प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे मुंबईतील बहुतांश नागरिकांचे कोरोनाचे दोन डोस घेऊन झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्यासाठी कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने केली आहे.

Mumbai train
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 'ऑपरेशन ऑलआऊट'

कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी सरकारने नियमावली जाहिर केली. लाॅकडाऊन, कडक निर्बंध, सौम्य, तीव्र, अंशतः असे वेगवेगळे निर्बंध लावण्यात आले. मात्र, आता कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने नियोजित वेळेनुसार बाजारपेठा खुल्या केल्या जातात. इतर अनेक क्षेत्रे सुरू झाली आहेत. त्यामुळे पर्यायी वाहतूकीची गर्दी आधीपेक्षा वाढली आहे. या गर्दीत कोरोनाचा प्रसार होणार नाही का ? की फक्त लोकलच्या गर्दीमध्येच कोरोनाचा प्रसार होईल, असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेकडून विचारण्यात येत आहे.

कर्नाटक राज्य सरकारने जाहिर केलेल्या नियमावलीचे अनुकरण मुंबईत करणे आवश्यक आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा दिली पाहिजे. जेणेकरून प्रत्येकाचा प्रवास सुरक्षित आणि सुखरूप होईल. सरकारने आता सर्वसामान्य प्रवाशांच्या मागणीकडे लक्ष दिले पाहिजे. आता कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे. लसीकरणाचा वेग वाढला आहे. प्रत्येकजण कोरोना नियमांचे पालन करत आहे. त्यामुळे आता लोकल प्रवास सुरू करणे सर्वसामान्यांसाठी लाभदायक होईल, रोजगाराचा प्रश्न सोडविता येईल.

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.