मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना उपनगरीय लोकलमधून (Mumbai Railway) प्रवास करण्याची अनुमती नसल्याने कामधंदा, नोकरी, व्यवसाय करणे कठीण झाले आहे. लोकलमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (Essential Employees ) प्रवास करत आहेत. तर, दुपारच्यावेळी लोकल रिकाम्या धावत आहेत. परिणामी, सर्वसामान्य प्रवाशांना (Conman man Travelling) लोकल प्रवासाची मागणी जोर धरत आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही तर, सर्वसामान्य प्रवासी मतदानावर बहिष्कार (Banned Voting) टाकणार, अशी भावना समाज माध्यमावरून व्यक्त केली जात आहे. ( Mumbai railway travelling not For conman man voting bans in Election)
मागीलवर्षीच्या लाॅकडाऊनमुळे आणि आता कडक निर्बंधामुळे सर्वसामान्य नोकरदार वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे. अनेक क्षेत्रातील निर्बंध शिथिल झाल्याने नागरिकांना कामाच्या ठिकाणी जावेच लागत आहे. वर्क फ्रॉम होम आता फक्त मोजक्याच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लागू राहिले आहे. परिणामी, आता लोकल प्रवास खुला करावा. नाहीतर, येणाऱ्या पुढील निवडणुकीत सर्वसामान्य लोकल प्रवासी मतदानावर बहिष्कार घालेल. फक्त सरकारी कर्मचारी मतदान करतील, असा संदेश समाज माध्यामावरून फिरत आहे.
मतदानाच्यावेळी फक्त सरकारी कर्मचारीच मतदान करतील
लोकल प्रवासास बंदी आणलेला सर्वसामान्य प्रवासी मतदान करणार नाही. याचा विचार नेते मंडळींनी आताच करावा. मी या वर्षी मतदान करणार नाही..एक लोकल प्रवासी, अशा आशयाचा संदेश समाज माध्यामावरून प्रचंड प्रसारित होत आहे.
महिना 10 ते 15 हजार रूपये कमाविणाऱ्यांचे हाल प्रशासन, सरकारला कळत नाहीत. फक्त कोरोनाचे नियम सांगून भीती निर्माण केली जात आहे. मात्र, आता कोरोनाने नाही तर, भूकबळीने नागरिक मरतील. त्यापेक्षा सर्व निर्बंध तोडून, लढून मरूया, अशी जनभावना निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकल प्रवास तातडीने खुला करावा, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे. या आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघच्यावतीने पाठविण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशभरात लाॅकडाऊन घोषित केले. मात्र बाजार ठप्प झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसायावर गदा आली. आताही परिस्थितीही यापेक्षा भयानक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी उपनगरीय लोकल सेवा तातडीने सुरू करणे आवश्यक आहे. यामध्ये प्राधान्याने कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास खुला करावा. त्यामुळे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य प्रवाशांचे जीवनचक्र सुरळीत होण्यास मदत होईल. प्रशासन, सरकारने या प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू केली नाही, तर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन सुरू करण्यात येईल, असे प्रहार जनशक्ति पक्ष प्रवक्ता मनोज टेकाडे आणि प्रहार जनशक्ती पक्ष संपर्क प्रमुख अजय तापकिर यांच्यावतीने सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.