नवीन वर्षात लोकलमध्ये वाय-फाय सुविधा; १६५ लोकलमधील ३,४६५ डब्यांत सेवा

wifi facility in mumbai train
wifi facility in mumbai trainsakal media
Updated on

मुंबई : लोकल प्रवासात (Train journey) प्रवाशांच्या मोबाईलचे नेटवर्क (mobile network issue) संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातात. त्यामुळे अनेक प्रवाशांना लोकलमध्ये असताना फोनवर बोलता येणे शक्य होत नाही. परिणामी, प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी लोकलमध्ये उच्च क्षमतेचा वाय-फाय राऊटर (WiFI internet facility) बसविण्यात येणार आहे. मागील अनेक कालावधीपासून रखडलेला हा प्रकल्प नवीन वर्षात पूर्ण (project completes in new year) करण्यात येणार आहे.

wifi facility in mumbai train
मुंबईत 48 तसात एक प्रवासी ओमिक्रॉन बाधित

मध्य रेल्वेच्या स्थानकावर वाय-फायची सुविधा आहे. मात्र, आता धावत्या लोकलमध्ये प्रवाशांना वाय-फायची सुविधा दिली जाणार आहे. रेल्वेत एकावेळी जास्त प्रवासी असतात, त्यामुळे एकावेळी जास्त जणांना रेंज मिळण्यासाठी ही यंत्रणा अधिक कार्यक्षम असणे गरजेचे आहे. त्यामुळे उच्च क्षमतेचा वाय-फाय बसविण्याची योजना आहे. मध्य रेल्वेद्वारे एका खासगी कंपनीद्वारे हे काम केले जाणार आहे. कंपनीमार्फत मध्य रेल्वेच्या १६५ लोकलमधील ३ हजार ४६५ डब्यांत वाय-फाय लावण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक डब्यात एक वाय-फाय लावले जात असून काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे.


रेल्वेचे उत्पादन वाढविण्यासाठी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीममार्फत (एनआयएनएफआरआयएस) अनेक उपक्रम रेल्वे विभागाकडून राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.