Mumbai Emergency Helpline: मुंबईकरांनो पावसात अडकलाय? 'या' क्रमांकावर साधा संपर्क तत्काळ मिळेल मदत

Mumbai Rain BMC: या परिस्थितीमुळे हवामान खात्याने मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत केली आहे.
Mumbai Rains BMC Emergency Helpline
Mumbai Rains BMC Emergency HelplineESakal
Updated on

मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस कोसळत असून, परिणामी मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरासह उपनगरातील अनेक रस्ते, रल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानकांचा परिसर पाण्याखाली गेला असून वाहतुकीसाठी हे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

या परिस्थितीमुळे हवामान खात्याने मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत केली आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अशी विनंती पालिकेने केली. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन महापालिकेने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.