Mumbai Rain Update : पालघर जिल्ह्यात भूस्खलनात दोघांचा मृत्यू

दिवसभरातील पावसाचे अपडेट्स या ठिकाणी पाहता येतील.
Mumbai Rain Update
Mumbai Rain Update
Updated on

मुंबईतील मुसळधार पावसामुळे मरीन ड्राईव्ह आणि नरिमन परिसरात झाडांची पडझड पहायला मिळाली. परंतु, मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या तत्परतेमुळे कोलमडून पडलेली झाडे पुर्नरोपण करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. परिणामी पडलेल्या झाडांना जीवनदान मिळाले आहे. आतापर्यंतच्या झालेल्या पावसाने ११३ झाडे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोलमडले आहेत. तर २०५ झाडाच्या फांद्या कोलमडण्याचे प्रकार समोर आले आहेत.

पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात बुधवारी झालेल्या भूस्खलनात एक व्यक्ती आणि त्याच्या मुलीचा मृत्यू झाला. अन्य दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये उद्या बंद

भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यानंतर पालघर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये १३ आणि १४ जुलै रोजी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील कुर्ल्यात पूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ पाणीच पाणी पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.

पवईतील इंदिरा नगरमध्ये दरड कोसळल्याचं वृत्त टीव्हीवरील एका वृत्तात देण्यात आलं आहे.

मुसळधार पावसामुळे गांधी मार्केट या सखल परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र उदंचन यंत्रणेच्या मदतीने गांधी मार्केट परिसरातील पाण्याचा उपसा करून ते भारत नगर नाल्यात सोडण्यात आले. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक सुरळीत झाली आहे.

मध्य रेल्वेनं पावसामुळं काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यामध्ये एलटीटी-सुलतानपूर, एलटीटी-गोरखपूर, पनवेल-गोरखपूर, सीएसएमटी-हावडा या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

मुंबईत मुसळधार पावसाची संततधार सुरुच आहे. या मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबईतील चेंबूरसह काही भागांत पाणी साचंल आहे. शेल कॉलनी, सावंत बाजार परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवहन केले आहे.

मुंबई : मॉन्सूननं आता राज्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली असून जवळपास सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतही गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरु असून याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला. त्यामुळं काही प्रमाणात लोकल ट्रेन्स आणि रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. सकाळपासून मुंबईत चांगला पाऊस सुरु आहे. दिवसभर मुंबईतील पावसाची स्थिती कशी असेल? याचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांना मिळतील. (Mumbai Rain Live Updates Mumbai daily rain all info here)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()