मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पहिल्याच पावसाने मुंबईत लोकल ठप्प झाली आहे. ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्ग पावसामुळे ठप्प झाला आहे. तसेच बाकीच्या काही स्टेशनवर पावसाने हजेरी लावल्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला आहे.
(Mumbai Rain Updates)
दरम्यान वरळी, दहिसर, ठाणे, मुलुंड, नवी मुंबई येथे पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रेल्वेबरोबर वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. रेल्वेच्या वेळापत्रकात काही काळासाठी बिघाड झाला असून सीएसएमटी स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली आहे. दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून ६ ते ८ किमी जाडीच्या ढगाचे थर जमा झाल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
याच्या ४८ तासात दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असल्याचं स्पष्ट झालंय.
दरवर्षीप्रमाणे पहिल्याच पावसात रेल्वेचा खोळंबा पहिल्याच पावसात झाला आहे. विविध भागांसह कल्याण डोंबिवलीमध्ये रिमझिम पाऊस पडला असून अंबरनाथ परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर नाशिक भागातही पावसाने हजेरी लावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.