Mumbai Rain: लोकलसाठी रेल्वे स्थानकात तुफान गर्दी! मुख्यमंत्र्यांनी बेस्ट, एसटीला दिले 'हे' आदेश

मुंबईत दिवसभरातील मुसळधार पावसामुळं अनेक लोकल गाड्या रद्द झाल्या आहेत.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal
Updated on

मुंबईत दिवसभरातील मुसळधार पावसामुळं अनेक लोकल गाड्या रद्द झाल्या आहेत. पण सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचा आता घरी परतताना मोठा खोळंबा झाला आहे.

यामुळं महत्वाच्या रेल्वे स्थानकांमध्ये तुफान गर्दी झाली आहे. यापार्श्वभूमीवर बेस्ट आणि एसटी प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. (Mumbai Rain rush in railway stations for local train CM Eknath Shinde gave order to BEST ST administration)

CM Eknath Shinde
Uddhav Thackeray meet Ajit Pawar : ठाकरे पिता-पुत्र थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला! उद्धव म्हणाले, जनतेला न्याय मिळेल कारण…

मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी शहरातील परिस्थितीबाबत चर्चा केली तसेच कन्ट्रोल रुममध्ये जाऊन शहरातील सर्व भागातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये कुठल्याही भागात आता पाणी साचलेलं नाही ट्राफिकही सुरळीत सुरु असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. (Latest Marathi News)

CM Eknath Shinde
Mumbai Rain: मुंबईत आज मुसळधार! मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; नागरिकांना केलं महत्वाचं आवाहन

रेल्वे स्थानकांत तुफान गर्दी

पावसामुळं लोकल ट्रेन रद्द झाल्यानं मुंबईतील सीएसएमटी, भायखळा, दादर, ठाणे आदी विविध रेल्वे स्थानकांमध्ये तुफान गर्दी झाली आहे. पण नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गर्दी झालेल्या रेल्वे स्थानकांबाहेरुन बेस्टच्या बसेस आणि एसटीच्या बसेस सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.