Mumbai Rain Update: हवामान खात्याने मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील एक तासापासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना देखील करावा लागत आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंधेरी सबवे. हा देखील पाण्याने संपूर्ण भरलेला असून साधारणपणे चार ते पाच फूट इतके पाणी साचल्यामुळे वाहतूक पोलिसांनी ये-जा करण्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांना बंदी केली आहे.
त्यामुळे आता अंधेरी पूर्वेकडे जाण्यासाठी वाहन चालकांना कॅप्टन गोरे पूल आणि ठाकरे उड्डाणपुलाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. (rain update)
मुंबईसह- उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.