Mumbai Rain: मुंबईत आज मुसळधार! मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; नागरिकांना केलं महत्वाचं आवाहन

मुंबई, ठाणे आणि उपनगरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे.
Chief Minister Eknath Shinde news
Chief Minister Eknath Shinde newssakal
Updated on

Mumbai Rain Update : मुंबई, ठाणे आणि उपनगरात आजपासून सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून नागरिकांना महत्वाचं आवाहनही केलं आहे. (Mumbai Rain update CM Eknath Shinde take review and appeals to the people)

Chief Minister Eknath Shinde news
Monsoon Session Day 3 : पावसामुळं दोन्ही सभागृहांचं आजच कामकाज तहकूब; दिवसभरात काय घडलंय जाणून घ्या

माध्यमांशी बोलातना मुख्यमंत्री म्हणाले, आज मुंबई आणि परिसरात खूप पाऊस झाला आहे. यामुळं निर्माण झालेल्या पूरस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. कुठलेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून एनडीआरएफ तसेच जिल्हा प्रशासनाना निर्देश देण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

Chief Minister Eknath Shinde news
Mumbai Rain Alert : मुंबईला येलो अलर्ट! ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत पुढील तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता

सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. (Marathi Tajya Batmya)

Chief Minister Eknath Shinde news
Konkan Rain: कोकणात अतिवृष्टी, परशुराम घाटात दरड कोसळली, प्रशासनाकडून २४X७ नियंत्रण कक्षाची स्थापना

नागरिकांना महत्वाचं आवाहन

दरम्यान, नागरिकांनी देखील मुख्यमंत्र्यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं, "हवामान खात्यानं अॅलर्ट जारी केले आहेत त्यानुसार, आवश्यक त्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये व सुरक्षितस्थळी राहावे"

Chief Minister Eknath Shinde news
Kalyan : हातातून निसटलं अन् नाल्यात वाहुन गेलं चार महिन्यांचं बाळ; आईचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

शाळा-कॉलेजची लवकर सुट्टी

तसेच मुंबई व परिसरातील शाळा-कॉलेजला लवकर सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडण्यात आलं आहे, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.