Mumbai Rains: मुंबईकरांनो सावधान! दीर्घकाळ मुसळधार पावसाचा इशारा, कामाचं नियोजन करण्यापूर्वी हवामान अंदाज वाचा

Mumbai Rains Update: मुंबईसह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण आहे. या भागात विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Dark clouds gather over Mumbai as IMD issues a warning for prolonged heavy rain
Dark clouds gather over Mumbai as IMD issues a warning for prolonged heavy rainesakal
Updated on

मुंबई: मुंबईकरांसाठी हवामान विभागाने आज दीर्घकाळ मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मुंबईत आज दिवसभर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. सध्या मुंबईतील वाऱ्याचा वेग खूपच कमी आहे, ज्यामुळे पावसाचे पट्टे जलद गतीने पुढे सरकणार नाहीत. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यास तो बराच काळ सुरू राहू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

तापमान आणि आर्द्रता-

आज मुंबईतील किमान तापमान 26.99 अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे, तर कमाल तापमान 28.87 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबईत आर्द्रता 77% आहे, ज्यामुळे वातावरण अधिक दमट आणि अस्वस्थ होऊ शकते. पावसामुळे गारवा अनुभवता येणार असला तरी कामाचं नियोजन करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण-

मुंबईसह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण आहे. या भागात विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिकसह मराठवाडा आणि विदर्भात काल पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः नाशिकमध्ये अवघ्या अर्ध्या तासात झालेल्या पावसाने शहराला जलमय केले होते.

Dark clouds gather over Mumbai as IMD issues a warning for prolonged heavy rain
BMC Recruitment 2024: मुंबई महापालिकेत मेगाभरती! तब्बल १,८४६ रिक्त पदं भरणार, अर्जाची Direct Link, शेवटची तारीख काय?

कामाचं नियोजन आणि सुरक्षितता-

मुंबईकरांनी दिवसभराच्या कामाचं नियोजन करताना हवामानाचा अंदाज ध्यानात घ्यावा. कामावर जाण्यापूर्वी किंवा बाहेर जाण्यापूर्वी हवामानाची स्थिती तपासून घ्यावी. पावसाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांसाठी 'नाउकास्ट चेतावणी' (Nowcast Warning) जारी केली आहे. या चेतावणीमुळे संभाव्य धोक्याची जाणीव करून देण्यात आली आहे. नागरिकांनी पावसाच्या दरम्यान आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Dark clouds gather over Mumbai as IMD issues a warning for prolonged heavy rain
शंभर वर्षांपूर्वीच्या नवसाच्या मूर्तीची चोरी, पांडवकालीन आहे इतिहास; नागनाथ मंदिरातूनही तांब्याची घंटा लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.