Rain Update : पहिल्या पावसात तिन्ही मार्गावरील लोकल सेवा विलंबाने !

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिट पर्यत विलंबाने धावत होत्या. त्यामुळे पहिल्याचा पावसात मुंबईकरांना लेटमार्क
mumbai rain update local train affect due to rain latemark railway traffic jam
mumbai rain update local train affect due to rain latemark railway traffic jamsakal
Updated on

मुंबई : शनिवारी सकाळीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे आणि रस्ते मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिट पर्यत विलंबाने धावत होत्या. त्यामुळे पहिल्याचा पावसात मुंबईकरांना लेटमार्क लागला आहे.

मुंबई आणि उपनगरात शनिवारी सकाळीपासून पाऊस सुरु झाला, त्यामुळे रेल्वे आणि रस्ते मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. चेंबूर, दादर, सायन, सायन - पनवेल महामार्ग, वाशी टोलनाका याठिकाणी वाहतूककोंडीमुळे वाहनांचा वेग मंदावला.

mumbai rain update local train affect due to rain latemark railway traffic jam
Monsoon Update : विदर्भात दाखल झाले मॉन्सून; पुढील चार दिवसात राज्याच्या आणखी भागांमध्ये करणार प्रवेश

तर पावसाचे पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून, वाहतूक व्यवस्था एस. व्ही. रोडच्या दिशेने वळवण्यात आली आहे. याशिवाय पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रेल्वे उशिराने धावत होती.

यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर १२ ते १५ मिनिटे, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १५ ते २० मिनिटे आणि हार्बर मार्गावर ८ ते १० मिनिटे लोकलसेवा उशिराने धावत असल्याचे चित्र दिसून आले आहेत. लोकल सेवा उशिराने धावत असल्याने घरी परतणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर अडकून तात्कळत लोकलची वाट पाहत रहावे लागत आहे.

mumbai rain update local train affect due to rain latemark railway traffic jam
Wakad Rain Update : वाकडमधील रस्त्यांवर पाणी अन वाहतूक कोंडी; नागरिकांत समाधान

पावसामुळे दृश्यमानता कमी होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोटरमन आणि लोको पायलेटला रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. यामुळे लोकल आणि रेल्वे गाड्यांचा वेगावर बंधने येतात. परिणामी लोकलचे वेळापत्रक कोलमडते.

पहिल्याच पावसात दिवसभरात लोकलची वाहतुक ठप्प झाली नसली तरी रेल्वेची वाहतुक विलंबाने सुरू होती. विशेष म्हणजे रविवारी ब्लॉक असल्याने शनिवारी शालेय खरेदी अथवा पावसाळी साहित्यांची खरेदीसाठी बाहेर पाडणाऱ्या मुंबईकरांना पहिल्याच पावसात रेल्वे विलंबाचा आणि गर्दीचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.