Mumbai Rain Update : मागाठाणे मेट्रो स्थानकाला कोणताही धोका नाही; महामुंबई मेट्रो

एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेकडून आढावा घेणे सुरु; साठलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे आव्हान
Mumbai Rain Update no threat to Magathane Metro station Mumbai Metro bmc
Mumbai Rain Update no threat to Magathane Metro station Mumbai Metro bmc sakal
Updated on

मुंबई : मागाठाणे मेट्रो स्थानकाला लागूनच असलेला बृहन्मुंबई महानगरपालिकेचा रस्ता सोमवारी खचला. ज्यामुळे मेट्रो स्थानकाच्या प्रवेश २ जवळील एस्किलेटर आणि जिन्याच्या एका भागाला धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे महामुंबई मेट्रोने उपपाययोजना म्हणून हा संपूर्ण भाग बंद ठेवला आहे. मात्र यामुळे मेट्रो स्थानकांच्या इमारतीला तसेच मेट्रो सेवेला कोणताही धोका नसल्याचे महामुंबई मेट्रोने सांगितले.

मागाठाणे मेट्रो रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वार २ जवळील पर्जन्य जलवाहिनीचे चेंबर स्थानकाचे जिने आणि एस्केलेटरच्या पायापासून अगदी जवळ आहे.

Mumbai Rain Update no threat to Magathane Metro station Mumbai Metro bmc
Mumbai News : पावसाळ्यात रस्ता दोन दिवसांत नीट करा; मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांचा ठेकेदाराला इशारा

मात्र या पर्जन्यजल वाहिनीच्या चेंबरला लागूनच चांडक नामक बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या खोल खोदकामामुळे आजूबाजूची माती ढासळून चेंबरच्या भिंतीला तडे गेले.

पावसाचा वाढत जोर यामुळे ही जलवाहिनी फुटून पाणी वेगाने यामुळे बांधकाम व्यावसायिकाने खोदलेल्या भागात जमा होते आहे.

यामुळे ड्रेन चेंबर आणि पायऱ्या व एस्केलेटरचा पाया आणखी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, संपूर्ण इमारतीला धोका नसून आता परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचेही एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेने सांगितले.

Mumbai Rain Update no threat to Magathane Metro station Mumbai Metro bmc
Mumbai Traffic Update : पावसामुळे मुंबईकरांची दैना! पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

घटनास्थळी बांधकाम पूर्णतः थांबले असून आता बिल्डर आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पर्जन्य जलवाहिनीतून वाहणाऱ्या पाण्याचा वेग रोखून जागेत साठलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे आव्हान आहे.

यासाठी त्याभागातील खोदकाम केलेली माती हटविण्याचे काम सुरु आहे. मात्र अद्याप पर्जन्य जलवाहिनीतून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह बांधकाम व्यावसायिकाच्या जागेत सुरूच आहे. यामुळे खोदकाम केलेल्या भागात पाणी साठले आहे.

Mumbai Rain Update no threat to Magathane Metro station Mumbai Metro bmc
Mumbai : स्वामी समर्थ मठ आवारातील चारचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीत कैद

"दर २ तासांनी बिल्डरकडून सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला जात आहे. पाण्याचा प्रवाह थांबल्याशिवाय पुढील काम करणे शक्य नाही.

त्यामुळे सर्वप्रथम त्याभागातील माती हटवून पाण्याचा प्रवाह नियंत्रणात आणला जाईल. त्यानंतर पर्जन्य जलवाहिनी विभाग पुढील कार्यवाही करेल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आर मध्य विभागच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.