Mumbai Rain Update : अंबरनाथ येथील नाल्याच्या प्रवाहाने रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने रेल्वे सेवा ठप्प

अंबरनाथ येथील नाल्याच्या प्रवाहाने रुळाखालील खडी गेली वाहून
mumbai rain update railway service stop due to heavy rain railway track under water
mumbai rain update railway service stop due to heavy rain railway track under watersakal
Updated on

डोंबिवली - रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. नद्या देखील दुथडी भरुन वहात असून धोक्याची पातळी नद्यांनी गाठली आहे.

त्यातच अंबरनाथ पुढील रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सकाळपासून मध्य रेल्वे मार्गावरील लोकलवर याचा परिणाम झाला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील मुख्य नाला हा धोकादायक स्थितीत असल्याने या नाल्याचे पाणी हे रेल्वे रुळांवर आले.

दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर या पाण्याचा प्रवाह वाढून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांच्या मध्यावर असलेल्या रेल्वे रुळाखालील खडी देखील वाहून गेली आहे. हा रेल्वे मार्ग धोकादायक झाल्याने या ठिकाणची अप आणि डाऊन दिशेकडील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

mumbai rain update railway service stop due to heavy rain railway track under water
Nashik Rain Alert : जिल्ह्यातील घाट विभागामध्ये आज अन उद्या जोरदार पावसाचा अंदाज

अंबरनाथ, बदलापूर परिसरात पावसाचा जोर जास्त असून सकाळपासून येथील नद्या नाले भरुन वाहत असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळी 10 च्या दरम्यान अंबरनाथ शहरातील नाले भरुन वाहू लागले या नाल्यांचा प्रवास रेल्वे रुळांवर येऊन रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. या पाण्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन रेल्वे सेवा ठप्प झाली. सुमारे अर्धा तास या मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली.

अर्धा पाऊण तासानंतर बदलापूर येथून मुंबईच्या दिशेने एक लोकल सोडण्यात आली. ही लोकल गेल्यानंतर मात्र पावसाचा जोर कायम असल्याने व रेल्वे रुळांवर पाणी आल्याने अप आणि डाऊन दोन्ही दिशेकडील वाहतूक सेवा ही ठप्प झाली. तीन तासापासून ही सेवा ठप्प आहे, तसेच मुंबईहून अंबरनाथ पर्यंत लोकल चालविल्या जात होत्या.

mumbai rain update railway service stop due to heavy rain railway track under water
Mumbai Rain Update : मुंबईत जोरदार पाऊस; पुढील दोन दिवस मुसळधार कोसळणार

अंबरनाथच्या बी केबिन परिसरातील मुख्य नाल्याने रेल्वे रुळाखालील खडी देखील वाहून नेल्याने हा रेल्वे मार्ग धोकादायक झाला होता. सकाळी 11 पासून दुपारी दोन वाजेपर्यंत एकही लोकल अथवा एक्सप्रेस गाडी सोडण्यात आलेली नाही.

पावसाचा पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट अधिकारी बघत होते. रेल्वे रुळाखालील वाहून गेलेली खडी पूर्ववत करण्यासाठी 30 ते 40 कर्मचारी देखील बोलावण्यात आले होते. मात्र पावसाचा प्रवाह कमी होत नसल्याने या कर्मचाऱ्यांना देखील पावसाच्या विश्रांतीची वाट पहावी लागली.

रेल्वे रुळाखालील संपूर्ण खडी नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने अधिकाऱ्यांनी देखील या रेल्वे रुळाखालील पाण्याची पातळी तपासून युद्ध पातळीवर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र गेल्या तीन तासापासून रेल्वे सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

mumbai rain update railway service stop due to heavy rain railway track under water
Mumbai News : कुमार विश्वकोशातून अंकुरण ते ज्ञानेंद्रियाचा होणार उलगडा; तब्बल २० वर्षानंतर येणार कुमार कोशाचे खंड

रेल्वे रुळावर पाणी साचण्याचा प्रकार अंबरनाथच्या मोरीवली गाव परिसरात देखील घडला असून त्या ठिकाणी देखील नाले भरून वाहत असल्यामुळे संपूर्ण पाणी रेल्वे रुळावर आले होते. बदलापुरातील प्रवाशांना मुंबई दिशेकडे एकही लोकल सोडण्यात आली नाही.

डोंबिवली ते कल्याण दरम्यान लोकलच्या रांगा

मध्य रेल्वे मार्गावरील अंबरनाथ पुढील रेल्वे सेवा ही ठप्प झाली. त्याचा परिणाम कल्याण पर्यंतच्या लोकल वाहतूकीवर देखील दिसून आला. डोंबिवली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या आहेत.

अनेक प्रवासी तासन तास वाट पाहिल्यानंतर रेल्वे रुळांवरुन चालून डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वे स्थानक रुळांवरुन चालत गाठत आहेत. रस्त्यांच्या मार्गाने इच्छित स्थळी जाण्याचा प्रवाशांचा प्रयत्न आहे. परंतू रस्त्यांवर देखील पावसाचे पाणी साचून वाहतूकीवर त्याचा परिणाम झाल्याने नागरिकांना घर गाठण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.