Mumbai Rain Update: मुंबईकरांसाठी 'रेड अलर्ट'; हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा, ठाणे-पालघरमध्ये जोर वाढला

Mumbai Rain Update Red Alert for Mumbaikars Meteorological Department: रविवारपासून पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा इशारा दिला आहे.
Mumbai Rain
Mumbai Rain

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, सध्या कधी मुसळधार तर कधी हलक्या सरी बरसत आहेत. सोमवारी (ता. १) अतिवृष्टीचा अंदाज असून हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारीकेला आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांची धावपळ उडण्याची शक्यता आहे. तीन दिवसांपासून मुंबईत पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. रविवारपासून पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा इशारा दिला आहे.

सुरुवातीचे काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. पण, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू लागला आहे. दोन-तीन दिवसांपासून मध्यम ते जास्त असा पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय होऊ शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन-चार दिवस पावसाचा जोर कायम असेल.

Mumbai Rain
Delhi Rain Updates : दिल्लीत जीवघेणा पाऊस! अंडरपासमध्ये बुडून तिघांचा मृत्यू, पावसामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू

शहरातील अनेक ठिकाणी शनिवारी चांगला पाऊस पडला. दादर, परळ आणि मुंबई सेंट्र्लमध्ये जोरदार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत कुलाबा केंद्रात २५ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ केंद्रात ३३ मिमी पावसाची नोंद झाली. तापमानातही घट झाली असल्याने मुंबईकर काहीसे सुखावले आहेत.

Mumbai Rain
Marathwada Rain: या महत्वाच्या कारणामूळे यंदा मराठवाड्यात पाऊस नाही, वाचा काया आहे तद्यांचे मत!

ठाणे आणि पालघरमध्ये मुसळघार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून पावसाचा जोर वाढेल. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस पडेल.

राज्यातही अनेक ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि कोकणात पाऊस चांगला पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com