Mumbai Rain : मुंबईत पहिल्याच पावसाने थैमान घातले. मुंबईत बऱ्याच टीकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे शिंदे सरकारवर टीका होत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी करणार असल्याचे म्हटले होते. यावर आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
इकबाल सिंह चहल म्हणाले, मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची सर्व नालेसफाईची काम पूर्ण केली आहेत. 114 टक्के काम आम्ही पूर्ण केलेत. शनिवारी जो पहिला पाऊस पडला ज्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरलं त्यामध्ये कमी वेळात अधिकचा पाऊस पडला आणि त्यात सखल भागात पाणी साचलं.
सखल भागात पाणी साचणार पण ते कमी वेळात निचरा कसा करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतोय.अंधेरी सबवे असेल किंवा इतर सभेमध्ये खोलगट भाग आहे. त्यामुळे तिथे पाणी साचणार खर तर आम्ही अंधेरी सबवे मोठा पाऊस पडला तर बंद करत असतो. मात्र गोखले ब्रिज बंद असल्यामुळे अंधेरी सबवे बंद करता येत नाही. पण खूपच पाणी साचलं तर आम्ही अंधेरी सबवे बंद करतो, असे चहल यांनी स्पष्ट केले.
मी सर्व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केले आहे जिथे पाणी साचले असेल तिथे फिल्डवर उतरून काम करा जवळपास एक लाख मुंबई महापालिकेचे कर्मचारी कामाला लागले आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी जरी मुसळधार पावसाने साचले तरी तातडीने निचरा कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न असेल. अंधेरी सभेचा प्रश्न मोगरा पंपिंग सेशन सुरू झाल्यानंतर मिटेल. मुंबईत काही वेळात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर पाणी साचायला सुरुवात होते.
पाणी कपातीचा निर्णय -
धरण क्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत एक जुलैपासून दहा टक्के पाणी कपात मुंबईमध्ये करत आहोत. पाणी कपात केल्यापासून एक आठवडा आम्ही पुन्हा एकदा धरण क्षेत्रातील पाणीसाठा बघू जर पाऊस पुरेसा पडला तर या निर्णयासंदर्भात पुनर्विचार करू मात्र सध्या तरी आम्ही पाणी कपात केली आहे, असे देखील चहल यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.