Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाचं पुनरागमन! पुढचे चार दिवस कसा असेल पाऊस?

Mumbai Rain Update:मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका,रेल्वे रुळांवर साचलं पाणी
Mumbai Rain Updatesakal
Updated on

मुंबई: मुंबईत पावसाचे पुनरागमन झाले असून आज काही भागात मुसळधार सरी कोसळल्या. आज दिवसभर काळयाकुट्ट ढगांमुळे दिवसभर अंधार दाटून आला होता. दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला.

कुलाबा वेधशाळेने पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. घाटकोपर ३.२ , विले पार्ले १४.४,विद्याविहार २,सायन १०.५ मिमी पावसाची नोंद झाली.सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सोमवारी सूर्याचे दर्शन झाले नाही. दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. बऱ्याच भागात मध्यम सरी तर अधून-मधून मुसळधार पाऊस झाला.

दिवसभरात सांताक्रुझ २०.६, कुलाबा २.० मिमी पाऊस झाला. हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी ग्रीन अलर्ट दिला असला तरी पावसाचा जोर राहणार आहे.या दरम्यान मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज देखील आहे.

Mumbai Rain Update:मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका,रेल्वे रुळांवर साचलं पाणी
Viral: खिशात पिस्तुलासारखं लायटर, प्रेयसीला भेटण्याचं कारण, बुरखा घालून तरुणाची एन्ट्री अन्... जे घडलं त्यानं सारेच हादरले

पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरात मधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडेल. मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० अंश सेल्सिअस आणि २७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.