Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

मुंबईत परतीच्या पावसानं कहर केला असून मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली
Updated on

Mumbai Rain Withdraw: मुंबईत परतीच्या पावसानं कहर केला असून मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळं मुंबईकरांचा मोठा खोळंबा झाला आहे. तसंच डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर मुंब्रा बायपासवर दरड कोसळल्यानं रस्ता वाहतूक ठप्प झाली आहे.

Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली
Generation Z Job Crisis : 'जेन-झी' तरुणांना नोकऱ्या मिळवताना का येत आहेत अडचणी? कंपन्यांनीच थेट सांगितलं कारण

कल्याण तालुक्यातील कांबा परिसरात दगडाच्या खाणीत काम करताना दोन कामागरांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. वीज पडून या कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली आहे. राजन यादव (वय 22) आणि बंदणा मुंडा (वय 25) अशी मृत कामगारांची नावं आहेत. याचा अधिक तपास टिटवाळा पोलिस करीत आहेत.

Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली
Generation Z Job Crisis : 'जेन-झी' तरुणांना नोकऱ्या मिळवताना का येत आहेत अडचणी? कंपन्यांनीच थेट सांगितलं कारण

तर मुंब्रा बायपासजवळ बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास मुंब्रा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असताना डोंगराच्या कडेला असणाऱ्या खडीमशीन जवळील सैनिकनगर इथं रस्त्यावर दरड कोसळली. यामध्ये दगड माती खाली आल्यानं काहीकाळ वाहतूक संथ गतीनं सुरू होती. दरडीचा भाग कोसळताच मुंब्रा प्रभाग समिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी व मुंब्रा वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली
Mumbai School Holiday: मुंबई, ठाणे, पालघरमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर!

यावेळी दिवा येथून तातडीनं जेसिबी मशीन मागवून रस्त्यावरील दगड बाजूला करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं दगड बाजूला करून वाहतूक पोलिसांच्या मदतीनं मलबा व दगड बाजूला केल्याची माहिती मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त बाळू पिचड यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.