Mumbai News : चेंबूरमध्ये पावसाळ्यात रात्रीचे जागरण!

डोंगराच्या पायथ्याशी राहाणाऱ्या झोपडीधारकांच्या प्रश्नांकडे पालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची परिस्थिती.
Mumbai News
Mumbai News
Updated on

Mumbai : चेंबूर येथील भारतनगर, विष्णूनगर परिसरातील बंजारा तांडा, साई टेकडी, गणेश टेकडी, समता नगर, भीम टेकडी व हशू अडवाणी नगरात अंदाजे अडीच हजारांहून अधिक घरे आहेत; तर विष्णू नगर परिसरात चारशेपेक्षा अधिक घरे आहेत. डोंगराच्या पायथ्याशी राहाणाऱ्या झोपडीधारकांच्या प्रश्नांकडे पालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची परिस्थिती आहे.

Mumbai News
Mumbai Rain: मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा; पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पाऊस सुरू झाला की एखादी दुर्घटना घडेल की काय, या भीतीखाली लहान मुलांसह रहिवाशांना रात्र जागून काढावी लागते. दोन वर्षांपूर्वी १८ जुलैला बंजारा तांडामधील घरावर दरड कोसळून २७ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

दरड कोसळल्यानंतर म्हाडाने अर्धवट संरक्षक भिंत उभारून ठेवली आहे. म्हाडाने बांधलेल्या अर्धवट व काही ठिकाणी डोंगराची उंची व संरक्षक भिंतीची उंची समान झालेली आहे. परिणामी दरड कोसळली तर घरे दबून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Mumbai News
Mumbai News : दरडीची दहशत ! अँटॉप हिल टेकडी रहिवाशांना जीव मुठीत घेऊन दिवस काढायची वेळ

२०२१ मध्ये दरड कोसळल्यानंतर जिल्हाधिकारी व पालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले. संरक्षक भिंत स्ट्रक्चर ऑडिट प्लॅन तयार करण्यात आला आहे. प्रकिया सुरू आहे. शासनाने अंमलबजावणी केली पाहिजे.

- निधी शिंदे, माजी नगरसेविका (ठाकरे गट)

गेल्या दोन वर्षांपासून आमचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय. एखादी घटना घडली की तात्पुरते पुनर्वसन केले जाते. संरक्षक भिंतीचे काम अर्धवट करून ठेवले आहे. पाऊस आला की रात्र जागून काढावी लागते.

- सतीश साखरे, रहिवासी

Mumbai News
Mumbai News : अधेरी पूर्वेकडील कपोल बँकेत मोठी आग; सुदैवाने जीवितहानी नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.