Mumbai Rain News: मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. सोमवारी देखील पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे मुंबईच्या अनेक भागामध्ये पाणी साचलं आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी झालं असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने मुंबई आणि परिसरासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईतील अनेक भागात पुढील चार ते पाच तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने त्याचा परिणाम लोकलसेवेवर देखील झाला आहे. तिन्ही मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे आजही नोकरदारांना त्रास सहन करावा लागणार आहे.
कल्याण स्थानकावर सिंग्नल बिघाड झाला असल्यामुळे अप आणि डाऊनवरील लोकल या उशिराने धावत आहेत. चाकरमान्यांची मोठी गर्दी स्टेशनवर पाहायला मिळत आहे. हार्बर रेल्वे १० मिनिटे उशिराने धावत आहे. दिवसभर असाच पाऊस सुरु राहिल्यास मुंबईकरांना मनस्ताप सहन कराला लागू शकतो.
पावसाचा विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे. इंडिया एअरलाईन्सने एक्सवर ट्वीट करून माहिती दिलीये की, 'मुंबईत काही दिवसांपासून पाऊस सुरु असून पुढे काही दिवस पाऊस सुरुच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपया तुमच्या फ्लाईटचे स्टेटस तपासत रहा. तुमच्या प्रवासाचे काळजी घेऊन नियोजन करा.' माहितीनुसार, रविवारी पावसामुळे ३६ फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय अनेक फ्लाईट उशिराने धावत होत्या.
मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी रविवारी सायंकाळी मुंबईकरांना घरीच राहण्याचे आवाहन केले होते. मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. आज सव्वा अकराच्या सुमारास समूद्रात भरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे किनाऱ्यावर मोठ्या लाटा पाहायला मिळू शकतात. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.