Raksha Bandhan 2023 : लालपरीतून महिला वर्गाला सवलत जाहीर झाल्यानंतरचा हा पहिला रक्षाबंधन असल्याने जणू त्यांच्यासाठी सवलतीची राखी असणार आहे. त्यानुसार बहीण-भावाच्या नात्याचे अतूट बंधन असलेल्या रक्षाबंधनासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ठाणे विभाग आता सज्ज झाला आहे
यंदाही रक्षाबंधनाला बुधवारी होणारी गर्दी लक्षात घेत, नियमित गाड्यांसह ९० जादा गाड्या विशेष मार्गांवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
नारळीपौर्णिमा तसेच रक्षाबंधन या दिवशी ठाणे विभागातील प्रत्येक आगारात दरवर्षी प्रवाशांची मोठी रेलचेल असते. रक्षाबंधनादिवशी विभागास नेहमीच समाधानकारक भारमान प्राप्त होत असते.
त्यामुळे गेल्या वर्षी चार लाख ५१ हजार ३४१ रुपये उत्पन्नाच्या स्वरूपात धनलक्ष्मी एसटीच्या तिजोरीत जमा झाली होती. यावर्षीही या कालावधीत मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होणार असल्याची शक्यता असल्याने आगारांनी चांगले भारमान असणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात जादा वाहतूक करण्याबाबत सूचना केल्या आहेत. या दिवशी आगारांतील एकही वाहन मार्ग बंद राहणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. याशिवाय गर्दीचा निपटारा योग्य
अशा सुटणार जादा गाड्या
ठाणे १ : पुणे ४, बोरिवली ४, भाईदर ३ , सातारा ३, कोल्हापूर १
ठाणे २ : पुणे २, बोरिवली २, पनवेल ६, भिवंडी ३, सातारा १, कोल्हापूर १
भिवंडी : ठाणे ३, बोरिवली २, कल्याण ४, पुणे १, नगर १
शहापूर : कसारा-नाशिक ३, भिवंडी-ठाणे २, भिवंडी-कल्याण २, शहापूर-किन्हवली ३
कल्याण: नगर ३, आळेफाटा ३, पनवेल ४, भिवंडी ३
मुरबाड : कल्याण ३, नगर १, आळेफाटा ३
विठ्ठलवाडी : कल्याण-भिवंडी ३, कल्याण-पनवेल ३, कल्याण-जव्हार ३, आळेफाटा १
वाडा : ठाणे ३, पुणे २, कल्याण ३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.