निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत फिरली चक्र, 'अशा' केल्यात काही महत्त्वाच्या उपाय योजना...

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत फिरली चक्र, 'अशा' केल्यात काही महत्त्वाच्या उपाय योजना...
Updated on

मुंबई : निसर्ग चक्रिवादळाच्या पार्श्वभुमीवर महापालिकेने आपात्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. शेल्टर होम म्हणून पालिकेच्या शाळा तयार ठेवण्याबरोबरच अग्निशमन दलाचे बचाव पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.

अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या निसर्ग चक्रिवादळाचा प्रभाव पुढील दोन दिवस मुंबई किनारपट्टीवर राहाणार आहे. याकाळात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून समुद्रात ताशी 90 किलोमिटर पेक्षा वेगाने वारे वाहाणार आहेत. बुधवारी वाऱ्याचा वेग ताशी 100 किलोमिटरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

मुंबईतील कोळीवाडे किनारी भागात असून काही वस्त्याही किनाऱ्यांवर आहेत. त्यांना आवश्यक सुचना महापालिकेकडून देण्यात येतील. असे पालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलंय 

किनारी भागातील रहिवाशांचे स्थालांतर करायचे झाल्यास पालिकेच्या 4 शाळा शेल्टर होम म्हणून तयार करण्यात आल्या आहेत.अशी माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली. तर, अग्निशमन दलाचे आपत्तीनिवारण पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. यात जिवरक्षक, स्पिडबोट, रेक्यूबोट तसेच इतर आवश्यक यंत्रणा असल्याचे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांदळे यांनी सांगितले.

पश्चिम उपनगरातील किनारी भागात राहणाऱ्या नागरीकांनाही धोक्याची सुचना देण्यात येणार असल्याचे एका अधिकार्याने सांगितले.

लॉकडाऊनमुळे दिलासा

सुट्ट्याचा कालावधी असल्याने चौपाट्या तसेच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करणं यंत्रणेला आव्हानात्मक होतं. मात्र, ताळेबंदीमुळे पालिकेला या कामातून दिलासा मिळाला आहे.

अमित शाह यांनी  बोलावली बैठक 

महाराष्ट्र किनारपट्टी तसेच गुजरात किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत NDM म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन  प्रदीकरणाची बैठक घेतली. दरम्यान निसर्ग हे चक्रीवादळ ३ जुंरोजी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये धडकण्याची अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून आढावा घेण्यात आला. 

mumbai ready to face nisarg cyclone 3 NDRF teams are deputed in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.