Mumbai : मुंबईकरांना दिलासा! मेट्रो प्रकल्पामुळे अडवलेले ८४ किमीचे रस्ते वाहतुकीसाठी मोकळे

Mumbai Police
Mumbai Policeesakal
Updated on

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्सून दरम्यान रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रो प्रकल्पातील उन्नत मार्गाचे काम पूर्ण झालेल्या मार्गातील बॅरिकेड्स हटविले आहेत. ६ मेट्रो प्रकल्पातील एकुण ३३, ९२२ बॅरिकेडस काढल्याने दुतर्फा ८४.८०६ (४२ किमी एकेरी रस्ता) किमी. लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.

Mumbai Police
Mumbai : दक्षिण मुंबईतील ४ झोपडपट्टीतील सांडपाण्यावर होणार प्रक्रिया; काम प्रगतीपथावर !

मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ३३७ किमी लांब मेट्रोचं जाळं प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत आहे. त्यापैकी मेट्रो मार्ग २ब, ४, ४अ, ५,६, ७अ आणि ९ या मेट्रो मार्गांसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्स पैकी सुमारे ६० टक्के बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी १-१ मार्गिका वाहतूकीसाठी उपलब्ध झाली आहे.

कोणत्याही निर्माणाधीन प्रकल्पात नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरीकेड्स लावून तो प्रकल्प पुर्ण होईपर्यंत रस्ता अडवला जातो. यामुळे नागरीकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावं जागते. त्यावर उपाय म्हणुन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.

तसचे काही ठिकाणी बॅरिकेड्स ठेवणं अपरिहार्य होतं तिथे ते रस्त्याची कमीत कमी जागा व्यापतील अशा पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला गेला. ज्यामुळे अशा ठिकाणी ८ किमीहून लांबीचा अधिक रुंद रस्ता उपलब्ध झाला आहे. एकुण ३३५२ बॅरिकेड्स अशा पद्धतीने कमी कमी जागा व्यापतील असे पुनर्रचना करण्यात आले.

Mumbai Police
Devendra Fadanvis: CM शिंदेंना शह देण्यासाठीच फडणवीसांकडून शरद पवारांच्या नावाचा वापर; NCPच्या नेत्याचा दावा

महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी मुंबई महानगर प्रदेशात प्रगतीपथावर असलेल्या सर्व मेट्रो प्रकल्पातील काम पूर्ण झालेल्या ठिकाणचे बॅरिकेड्स काढून रस्ते पूर्वस्थितीत खुले करण्याचे निर्देश दिले.

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग, बीकेसी, एस. व्हि.रोड, वी.एन. पुरव मार्ग(चेंबूर नाका), न्यू लिंक रोड, गुलमोहर रोड, एम जी रोड, घोडबंदर रोड, कापूरबावडी, बाळकुम, दहिसर, मिरारोड, भाईंदर, ठाणे, तीन हात नाका, जेव्हिएलआर, इन्फिनिटी मॉल, पवई, कांजूरमार्ग, मानखुर्द या भागातील प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो मार्गांवरील हे बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रकल्पाच्या दोन्ही बाजूची १- १ मार्गिका वाहतूकीसाठी मोकळी करून नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

Mumbai Police
Mumbai Crime : ज्वेलर्सचे दुकान फोडायला आले अन् मार खाऊन जेलमध्ये गेले! डोंबिवलीत चोरीचा प्रयत्न फसला

बॅरिकेड्स हटवण्यात आलेल्या रस्त्यांचा तपशील

मेट्रो मार्ग २ब गुलमोहर रोड (जुहू सर्कल ते मिठीबाई महाविद्यालय)

१.७६७ किमी

एस.व्ही. रोड (विले पार्ले जंक्शन ते मिलन सबवे)

१.०५७ किमी

बी.के.सी रोड (कलानगर ते MTNL)

१.५३६ किमी

वि.एन. पूर्व मार्ग (डायमंड गार्डन ते BARC फ्लायओव्हर)

१.४०८ किमी

सायन- पनवेल हायवे o(BARC फ्लायओव्हर ते मानखुर्द फ्लायओव्हर)

१.४५९ किमी

मेट्रो मार्ग ४आणि ४अ

९० फिट रोड

३.९९० किमी

एल.बी. एस मार्ग (वेगवेगळ्या तीन ठिकाणी)

१५ किमी

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे

४.७२६ किमी

घोडबंदर रोड (वेगवेगळ्या दोन ठिकाणी)

४किमी

डेपो रोड

१.१५४किमी

मेट्रो मार्ग ५

कापूरबावडी ते बाळकुम नाका

१.५५३ किमी

बाळकुम नाका ते अंजूरफाटा

७.५७३ किमी

अंजूरफाटा ते धामणकर नाका

२.०३३ किमी

मेट्रो मार्ग ६

JVLR (WEH जंक्शन ते महाकाली लेणी)

४.३० किमी

JVLR (महाकाली लेणी ते पवई तलाव)

४.१९किमी

JVLR (पवई तलाव- विक्रोळी - EEH वर कांजूर मार्ग डेपो)

६.५ किमी

मेट्रो मार्ग ९

ओवारीपाडा जंक्शन ते दहिसर टोल

१.६४८ किमी

दहिसर टोल ते डेल्टा

१.७१० किमी

मुंबईकरांना इजा होऊ नये म्हणून प्रकल्पाच्या ठिकाणी विशिष्ट जागा बॅरिकेड्स ने प्रतिबंधित करावी लागते. मात्र मुंबई मेट्रो प्रकल्पातील ज्या ज्या टप्प्यातील कामं झाली आहेत अशा ठिकाणचे अडथळे काढुन तो रस्ता मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे.

दर १५ दिवसांनी मेट्रोच्या कामाचा आणि बॅरिकेड्सचा आढावा घेतला जाईल आणि एखाद्या ठिकाणी काम संपलं की लगेचच तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन दिला जाईल. अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.