मुंबईत पुन्हा रूग्ण वाढ; 24 तासांत 16 हजारांहून अधिकांची नोंद

आज महाराष्ट्रात 46,000 कोविड रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
Coroana
CoroanaANI
Updated on

मुंबई : मुंबईतील कोरोना (Mumbai Corona Updates) रुग्णांचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या 24 तासांत येथे 16, 420 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी मुंबईत कोरोना (Corona Cases In Mumbai) बाधितांचा आकडा 11, 647 इतका नोंदविण्यात आला होता. तर दुसरीकडे राज्यात देखील कोरोना रूग्णसंख्या वाढता दिसत असून, आज महाराष्ट्रात 46,000 कोविड रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नव्याने नोंद करण्यात आलेल्या रूग्णांपैकी 83 टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे दिसून आलेली नाहीत, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Mumbai Latest Corona Update)

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या (Mumbai Latest Active Corona Cases) 102,282 वर नोंदविण्यात आली आहे. बुधवारी एकूण 916 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 98 रुग्णांना ऑक्सिजनची (Oxygen) आवश्यकता भासली. सोमवारी मुंबईमध्ये 13, 648 आणि रविवारी 19,474 नवीन रुग्णांची पुष्टी करण्यात आली होती. तर शनिवारी 20 हजार 318 नवीन कोविड पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते.

Coroana
राज्यात कोरोनाचा आलेख वाढला; 46,723 रूग्णांची नोंद

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) म्हणाले की, आज महाराष्ट्रात 46,000 कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे लोकांनी निर्बंध शिथिल करण्याची अपेक्षा करू नये. पण घाबरण्याची गरज नाही. एकूण सक्रिय रूग्णांपैकी, 86% गंभीर नाहीत आणि 0.32% रुग्णांना व्हेंटिलेटरवर असल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Latest Corona Updates In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.