मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी रूग्णसंख्या घटली; दोघांचा मृत्यू

सध्या मुंबईत कोरोनाचे 1, 00,523 सक्रिय रूग्ण आहेत.
corona lab nashik
corona lab nashiksakal
Updated on

मुंबई - सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील कोरोनो रूग्णांच्या संख्या कमी नोंदविण्यात आली असून घटत्या रूग्णसंख्येमुळे नागरिकांसह प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज 11, 647 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे 1, 00,523 सक्रिय रूग्ण आहेत.

मुंबईत आज 14 हजार 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर नोंदविण्यात आला आहे. मुंबईत आज दोन रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत कोरोनामुळे मुंबईत मृत्यू झालेल्यांची संख्या 16 हजार 413 इतकी झाली आहे. दरम्यान मागच्या आठवड्यात मुंबईत 20 हजारांच्या पुढे नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात येत होती, त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, दोन दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांची संख्या घटल्याने नागरिकांसह प्रशासनाने काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे, असे म्हणता येईल.

corona lab nashik
रुग्णांना दवाखान्यात दाखल करताय? जाणून घ्या केंद्राच्या सूचना

देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ४,४६१

गेल्या २४ तासात देशात १ लाख ६८ हजार ६३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर ६९ हजार ९५९ जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनमुळे चिंता व्यक्त केली जात असताना त्याच्याही नव्या रुग्णसंख्येचा वेग सध्या मंदावला आहे. गेल्या दोन दिवसात ५०० च्या आसपास ओमिक्रॉनचे रुग्ण दिवसभरात सापडत आहेत. काल ४ हजार रुग्णांचा टप्पा पार केल्यानंतर आज एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या ४ हजार ४६१ इतकी झाली आहे. सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ८ लाख २१ हजार ४४६ इतकी आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट १०.६४ टक्के इतका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.