मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईत कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. एकेकाळी धारावी हा परिसर कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरला होता. मात्र आता धारावीत कोरोना नियंत्रणात आला आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यास आरोग्य प्रशासनाला यश आल्याचं दिसतंय. गेल्या दहा दिवसांपासून धारावीत एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही आहे. त्यामुळे धारावीकरांसोबतच मुंबई पालिकेसाठी ही दिलासादायक बाब आहे.
रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजनांमुळेच धारावीतील रुग्णांच्या संख्येत घट देखील झाली आहे. रुग्णासोबतच आता या भागातील मृत्यूदरही आटोक्यात आला आहे. धारावीतील झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश येताना दिसतंय. जून, जुलैपासून कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होण्याच्या प्रमाणातही घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आहे.
धारावीत कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं केलेल्या ठोस उपाययोजनांमुळं एप्रिल, मे आणि जूनमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आलं आहे. धारावीत रविवारी फक्त ५ नवे रुग्ण आढळून आलेत. धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत होती. त्यामुळे सगळ्यांना चिंता लागून राहिली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेनं या भागात मिशन धारावी ही योजना राबवली. त्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आलेत. मिशन धारावीमुळे रुग्णांची संख्या कमी करण्यात यश आलं आहे.
धारावीत सद्यपरिस्थितीत २ हजार ६३४ कोरोनाचे रुग्ण आहेत. ज्यामध्ये २ हजार २९५ लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आत्तापर्यंत २५६ कोरोनाबाधित रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात एप्रिल महिन्यात ६७ मृत्यू, १५४ मृत्यू मे महिन्यात, जूनमध्ये ३७ मृत्यू आणि ७ लोकांचा मृत्यू जुलैमध्ये झाल्याची नोंद आहे.
चांगली गोष्ट म्हणजे, १ ऑगस्टनंतर धारावीत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही आहे. तसंच, रुग्णवाढीचा आकडाही घटला आहे. धारावीत सध्या फक्त ८१ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मंगळवारी धारावीत फक्त ८ नवीन रुग्ण आढळून आलेत. जुलैच्या तुलनेनं धारावीत कोरोना रुग्णांची संख्येत घट झाली आहे.
१ एप्रिलला दाटीवाटीच्या झोपड्या आणि चाळी असलेल्या धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. चिंतेची बाब म्हणजे, त्याच दिवशी त्या रुग्णाचा मृत्यू देखील झाला. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. या परिसरात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होणं अशक्य होतं. त्यामुळे तात्काळ दोन ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आली. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना या केंद्रांमध्ये पाठवण्यास सुरुवात केली गेली. घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी, खासगी डॉक्टर आणि पालिकेच्या दवाखान्यांमध्ये सुरू केलेली तपासणी, मोबाइल दवाखाने, तपासणी शिबीर आदी विविध पाययोजनांमुळे धारावीमधील कोरोनाचा आकडा आता नियंत्रणात येऊ लागला आहे.
Mumbai reports dharavi New covid 19 active cases only 81
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.