Mumbai : पर्यटन बसला प्रतिसाद नसल्याने प्रवासी बसमध्ये रुपांतर

केडीएमटीने बसचे रुपडे पालटले आहे का असा विचार मनात आला, पण बसचे रुपडे पालटले नाही पर्यटन बस जुन्या वळणावर आली आहे.
Mumbai
Mumbaisakal
Updated on

Mumbai - खडखड खडखड आवाज करणारी, धूर सोडणारी कळकट मळकट अशी बस म्हणजे केडीएमटीच्या बस असे समीकरण प्रवाशांच्या डोक्यात बसले आहे. पण बस थांब्यावर बसची वाट पहात असताच तुमच्या समोर अलिशान अशी ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाची चित्र रेखाटलेली, बुरुजांची प्रतिमा असलेला प्रशस्त दरवाजा असलेली बस उभी राहिली तर...कल्याण डोंबिवली मधील प्रवासी सध्या अशा बसमधून प्रवासाचा अनुभव घेत आहेत.

केडीएमटीने बसचे रुपडे पालटले आहे का असा विचार मनात आला...पण बसचे रुपडे पालटले नाही पर्यटन बस जुन्या वळणावर आली आहे. केडीएमटी ने दोन वर्षापूर्वी मोठ्या थाटात पर्यटन बससेवेचा शुभारंभ केला. मात्र या उपक्रमाला प्रतिसाद न मिळाल्याने या बसचे प्रवासी बसमध्ये रुपांतर करण्याची वेळ नामुष्की केडीएमटी प्रशासनावर ओढावली आहे.

बीएमसीच्या वतीने जशी मुंबई दर्शन बससेवा चालवली जाते. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली मध्ये पर्यटन बससेवा सुरु करण्याची मागणी होत होती. त्यानुसार मार्च 2021 मध्ये या मागणीस हिरवा कंदिल दाखविण्यात आला.

लाखो रुपये खर्च करुन या बसची निर्मिती केली गेली. दुर्गाडी किल्ला ची प्रतिकृती म्हणून बुरुजाचे प्रवेशद्वार, डोंबिवलीतील रणगाडा, टिटवाळा येथील गणपती मंदिर अशी कल्याण डोंबिवली मधील ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटन स्थळांचा आढावा घेणारी रेखाचित्र, वास्तूशिल्प या बसवर रेखाटण्यात आली आहेत.

सप्टेंबर महिन्यात या बसचा थाटामाटात शुभारंभ केला. ऑक्टोबर पासून ही बस प्रवाशांच्या सेवेस उपलब्ध झाली. 22 आसनांची ही बस असून सुरुवातीला या बसला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मात्र नागरिकांचा ओघ कमी होत गेला. प्रवाशांचा प्रतिसाद कमी होताच केडीएमटी प्रशासनाने प्रवाशांना बस बुक करावयाची असल्यास 48 तास अगोदर तिकीट नोंदणी करणे अत्यावश्यक केले.

Mumbai
Mumbai : ठाकरे गटाला पक्षांतराचा धसका! माजी नगरसेवकांची तातडीने बोलावली बैठक

22 आसनांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशांना त्याची माहिती दिली जात होती. शिवाय गट समुहामध्ये 22 नागरिक नसतील तर पूर्ण बसचे बुकींग करण्याची सक्ती प्रवाशांवर केली जात होती. एका आसनासाठी 150 रुपये दर आकारला जात होता. यामुळे 3 ते 4 हजाराचा फटका प्रवाशांच्या खिशाला बसत होता.

परिणामी बसचा प्रवाशांचा प्रतिसाद कमी होत गेला. कोरोना काळात नागरिक घरात अडकून असल्याने कोरोना कालखंड संपल्यानंतर शहरात का होईना परंतु या सुखद बसमधील प्रवाशांचा व पर्यटन स्थळांचा आनंदं प्रवासी घेत होते. परंतू केडीएमटी प्रशासन प्रवाशांच्या खिशाला कात्री लावू लागल्याने प्रवाशांनी त्याकडे देखील पाठ फिरवल्याचे दिसून येते.

Mumbai
Mumbai : ठाकरे गटाला पक्षांतराचा धसका! माजी नगरसेवकांची तातडीने बोलावली बैठक

प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाल्याने बस आगारात खितपत पडून ठेवण्याची वेळ केडीएमटी प्रशासनावर ओढावली. परंतू लाखो रुपये खर्च करुन तयार केलेली ही बस उभी राहून भंगारात जमा होऊ नये म्हणून केडीएमटी प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच खासगी कार्यक्रमांना भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.

याविषयी प्रशासन उघडपणे बोलत नसले तरी आगारात उभी राहून बस खराब होऊ नये म्हणून दिवसातून दोन तीन फेऱ्या या बसच्या शहरात चालविल्या जात असून प्रवाशांना ही त्याचा लाभ होत आहे प्रशासन अधिकारी सांगतात.

टिटवाळा गणेश मंदिर ते कल्याण शीळ मार्गावरील दत्तमंदिर अशी ही बस चालविली जात होती. यादरम्यानच्या दुर्गाडी किल्ला, दुर्गाडी गणेश घाट, बारावे जलशुद्धीकरण केंद्र, काळा तलाव, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक,

Mumbai
Mumbai : मुंबई महापालिकेची पोलिस चौकशी

आर्ट गॅलेरी, सुभेदारवाडा, डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर, शहीद कॅप्टन सच्चान स्मारक, शहरालगत असलेले खिडकाळी मंदिर, शीळ फाटा येथील दत्त मंदिर आदी पर्यटन आणि नयनरम्य स्थळांचा यात समावेश होता.

केवळ केडीएमसी क्षेत्रापुरते मर्यादीत न राहता मुंबई, ठाणे येथील पर्यटन स्थळांचा यात शमावेश करायला हवा होता. आठवड्यातील मोजके दिवस त्यासाठी ठेवायचे तसेच एखाद्या खासगी संस्थेस चालविण्यास ती दिली असती तर या उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला असता असे जाणकार सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()