Viral Video: रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना ऑटोरिक्षाने उडवले, भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Rickshaw Accident Video: दरम्यान ही घटना घडण्यापूर्वी मुंबईच्या मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडली, जिथे ऑडी कारने दोन ऑटोरिक्षांना धडक दिली, त्यात त्यांचे चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले.
Mumbai Rickshaw Accident
Mumbai Rickshaw AccidentEsakal
Updated on

वांद्रे येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या ऑटोरिक्षाने रस्ता ओलांडणाऱ्या दोन जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली होती. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता घडली होती मात्र आता त्याचे सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आले आहेत.

व्हिडिओमध्ये 2 लोक रस्ता ओलांडताना दिसत आहेत. अचानक एक भरधाव रिक्षा येते आणि त्यांना चिरडत पुढे जाते. अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडते आणि घटनास्थळी मोठी गर्दी होते.

Mumbai Rickshaw Accident
Vidhan Sabha Election: क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेल्या आमदाराला पुन्हा लढायचयं! 'या' पक्षाकडे मागितली उमेदवारी

दरम्यान ही घटना घडण्यापूर्वी मुंबईच्या मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडली, जिथे ऑडी कारने दोन ऑटोरिक्षांना धडक दिली, त्यात त्यांचे चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले. विजय दत्तात्री गोरे असे कार चालकाचे नाव असून त्याने आपले वाहन सोडून पळ काढला होता. 43 वर्षीय गोरेला अपघातानंतर काही तासांनी अटक करण्यात आली होती.

अपघातानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि घटनास्थळाची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी पुराव्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना पूर्ण प्रकरण लक्षात आले.

Mumbai Rickshaw Accident
Sassoon Hospital Pune: ससूनमध्ये धक्कादायक प्रकार! बेवारस रुग्णांसोबत डॉक्टरांचे अमानवी कृत्य; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

बीएमडब्ल्यूची स्कूटरला धडक

7 जुलै रोजी झालेल्या एका अपघातात, वरळीच्या एनी बेझंट रोडवर एका बीएमडब्ल्यू कारने स्कूटर चालवणाऱ्या एका जोडप्याला धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. कावेरी नाखवा असे मृत महिलेचे नाव होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार स्कूटरला धडकली तेव्हा मिहीर शाह कार चालवत होता. या घटनेनंतर मिहीर शाहने पोलिसांपासून वाचण्यासाठी दाढी कापली आणि पूर्णपणे वेश बदलून पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न सुरू केला. एवढे सगळे कारनामे करूनही तो पोलिसांच्या तावडीतून सुटू शकला नाही आणि 9 जुलै रोजी पोलिसांनी त्याला पकडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.