Mumbai - पावसाने मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांना निरनिराळ्या व्याधींनी जखडले आहे. खड्ड्यांतून खडतर प्रवास करताना पाय, मान आणि पाठदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. दुचाकी, रिक्षा, टॅक्सी आणि बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांत पाठ व कंबरदुखीचा त्रास बळावला आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
खड्ड्यांतून मोटारसायकल गेल्याने संपूर्ण शरीराला झटका बसतो. विशेषतः मणक्याला त्यामुळे गंभीर इजा होऊ शकते. दोन मणक्यांमध्ये नैसर्गिक आवरणाची गादी असते. त्यातील एखादी गादी सरकली तर त्रास होतो. ज्येष्ठांमध्ये मानेला व कंबरेला जोराचा धक्का लागल्यामुळे मणक्यामधील नसा दुखावून त्यांना दीर्घकालीन फिजिओथेरपी तसेच सक्तीच्या विश्रांतीला जावे लागत आहे.
दीर्घकालीन परिणाम
अपेक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे ज्येष्ठ अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. विजय पाटील यांनी सांगितले की, ‘खड्ड्यांमुळे पाठ, मान आणि कंबरदुखीचा त्रास होतो. मात्र, तरुणपणी त्याचे फारसे गांभीर्य नसते.
तरुण-तरुणी खड्ड्यांतून वेगाने गाड्या नेतात. त्यामुळे त्यांना दीर्घकालीन पाठदुखी होऊ शकते. त्याचबरोबर पाठ आणि मानदुखीचे प्रमाणही वाढले आहे. तीस ते चाळीस वयोगटांत हे प्रमाण जास्त असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक
५० ते ६० टक्के दुचाकीस्वार पाठींच्या दुखण्यांसह मानदुखीमुळे त्रस्त असतात. अनेकांना तीन ते सहा महिन्यांनंतर मणक्याचा त्रास सुरू होतो. दुचाकीस्वारांना मणक्याला झटका बसल्याने मणक्यात गॅप, चकती सरकणे या आजारांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
घरगुती उपाय टाळावेत, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत, असेही तज्ज्ञ सांगतात. सतत वाहन चालवल्याने अंगदुखीची समस्या वाढत असून विश्रांती घेण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
प्रवासादरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचते. त्यामुळे अंदाज न आल्याने गाडी जोरात आदळून मणका आणि कंबरेचा त्रास होतो. माकडहाड खाली-वर सरकल्यास पाठदुखी, दणक्यांमुळे हाडे फ्रॅक्चर होण्याचीही शक्यता असते. वृद्ध व्यक्तींत पाठदुखीचा त्रास अधिक वाढतो. दुचाकी चालवणाऱ्यांना साधारणत: स्पाँडेलिसिस, लम्बर्स स्पॉंडेलिसीस, स्लीप डिस्क हे आजार होतात. त्यातही अस्थिरोग किंवा व्यंग असलेले रुग्ण असतील तर त्यांना कमरेचे आणि पाठीचे आजार लवकर बळावतात.
- डॉ. पृथ्वीराज देशमुख, ऑर्थोपेडिक सर्जन, नेक्सस डे सर्जरी सेंटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.