Mumbai : ठाकुर्ली उड्डाणपूल जवळील 'ते' वळण धोकादायक

कोपर उड्डाणपूलानंतर ठाकुर्ली उड्डाणपूल हा शहरातील अंतर्गत भागातील कोंडी करण्यासाठी तसेच पूर्व पश्चिमेला ये जा करण्यासाठी वाहनांच्या दृष्टीने सोयीचा आहे. मात्र ठाकुर्ली उड्डाणपूल वरुन वाहतूक करताना पूर्वेच्या दिशेला उतरताना वाहन चालकांनी थोडी सावधानता बाळगली पाहीजे.
mumbai
mumbaisakal
Updated on

डोंबिवली - ठाकुर्ली उड्डाणपुलावरून पूर्वेला उतरताना तुम्हाला स.वा.जोशी रोड मार्गे सरळ जायचे आहे किंवा नेहरू रोड मार्गे ठाकुर्ली दिशेला जायचे आहे. पण थांबा उड्डाणपूल उतरल्यावर यू टर्न घेताना थोडे डाव्या बाजूला पहा आणि मग आपले वाहन चालवा.

नेहरु रोड मार्गे येणारी वाहने आणि उड्डाणपुलावरून येणारी वाहने ही समोरा समोर येत असल्याने या ठिकाणचे हे वळण अपघातांना निमंत्रण ठरत आहे. या ठिकाणी वाहन कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत असून सकाळ संध्याकाळ येथे वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

कोपर उड्डाणपूलानंतर ठाकुर्ली उड्डाणपूल हा शहरातील अंतर्गत भागातील कोंडी करण्यासाठी तसेच पूर्व पश्चिमेला ये जा करण्यासाठी वाहनांच्या दृष्टीने सोयीचा आहे. मात्र ठाकुर्ली उड्डाणपूल वरुन वाहतूक करताना पूर्वेच्या दिशेला उतरताना वाहन चालकांनी थोडी सावधानता बाळगली पाहीजे.

ठाकुर्ली उड्डाणपुलावरून पूर्वेला उतरताना तीन दिशेला वाहने जातात. एक वळण हे नेहरु मार्गे जाते, दुसरे वळण हे स.वा.जोशी शाळा मार्गे व तिसरे वळण म्हणजे पूलावरुन थेट डोंबिवली स्टेशन गणपती मंदिर मार्ग. कल्याण हून डोंबिवलीत येणारी अनेक वाहने ही आजच्या घडीला नेहरु रोड मार्गाचा वापर करत आहेत.

mumbai
Mumbai : ऐनवेळी लोकलच्या वेळा बदलल्यामुळे प्रवाशांना करावा लागला गर्दीचा सामना

ठाकुर्ली उड्डाणपूलाचे काम सुरु असताना हा मार्ग बंद असल्याने पंचायत बावडी मार्गावर मोठी कोंडी होत होती. आज ही या रस्त्यावर कोंडी होत असल्याने स्टेशन परिसर अथवा पश्चिमेला जाणारी वाहने ही नेहरू रोड मार्गे ठाकुर्ली उड्डाणपुलावर येतात. ठाकुर्ली पूल हा अरुंद असल्याने सकाळ संध्याकाळ या पूलावर वाहनांची कोंडी होते.

त्यासोबतच पूलाच्या उतारावर देखील कोंडी होत असल्याने वाहन चालक हैराण झाले आहेत. नेहरु रोड मार्गे येणारी वाहने आणि पूलावरुन उतरुन स.वा.जोशी मार्गे जाणारी अथवा नेहरु मार्गे जाणारी वाहने ही समोरा समोरच येत असल्याने या ठिकाणी वाहन चालकांचा गोंधळ उडून कोंडीसोबतच अपघात देखील घडत आहेत.

पूलावरुन उतरुन तुम्हाला नेहरु रोड मार्गे जायचे असल्यास यू टर्न मारण्यासाठी वाहनांना पुरेशी जागा नाही. मोठे वाहन असल्यास तर पूर्ण रस्ताच या वाहनांची टर्न मारताना अडविला जाण्याचे प्रकार घडतात.

तर काही वाहन चालक हे पूलावरुन उतरताना डायरेक्ट यू टर्न मारतात. अशावेळी नेहरू रोड मार्गे स्टेशन दिशेला जाणाऱ्या वाहनांची समोरा समोर धडक होण्याची स्थिती या ठिकाणी निर्माण होते.

नेहरू रोड हा पुलाच्या उताराच्या ठिकाणी चिंचोळा असल्याने या ठिकाणी मग कोंडी होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. दुपारच्या वेळेस वाहनांची वर्दळ जास्त नसल्याने अनेकदा वाहन चालक आपल्याच नादात गाडी घेऊन सुसाट निघतात.

अशावेळी पुलावरुन उतरताना त्यांना नेहरु रोड मार्गे येणारी वाहने न दिसल्याने धडक बसून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दुचाकी स्वार, रिक्षाचालकांचे असे अपघात देखील या ठिकाणी झाले आहेत. यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

mumbai
Mumbai Pune Highway Accident : अवघ्या ८ व्या वर्षी गमावला जीव; चिमुरड्याच्या शेवटच्या वादनाचा व्हिडीओ

उड्डाणपूल पूर्ण झाल्यास धोका टळेल...

ठाकुर्ली उड्डाणपूलाचे काम हे अर्धवट अवस्थेत आहे. ठाकुर्लीतील म्हसोबा चौकात हा पूल उतरविला जाणार आहे.

यामुळे भविष्यात डोंबिवली स्टेशन दिशेला येणारी वाहने देखील पूलाचा वापर करुन गणेश मंदिर रोड मार्गे जातील. नेहरु रोड मार्गाचा त्यावेळी जास्त वापर होणार नाही. तसेच ठाकुर्ली तील चोळेगाव भागात होणारी वाहन कोंडीची समस्या देखील यामुळे सुटेल असे मत तज्ञ मंडळी व्यक्त करतात.

ठाकुर्ली उड्डाणपूल वर वाहन कोंडीची समस्या आहेच. शिवाय अपघात होण्याची शक्यता देखील आहे. उड्डाणपूलावर येणारी वाहने व नेहरु रोड मार्गे येणारी वाहने यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने या ठिकाणी अपघात होत आहेत. वाहतूक पोलिस कधीतरी येथे वाहतूक नियंत्रित करताना दिसतात. हा वर्दळीचा मार्ग असल्याने या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी.

संदीप शेवाळे, वाहन चालक

पूलावरुन यू टर्न मारताना अनेकदा समोरुन वेगात वाहन आल्यास वाहन चालक गडबडतात. किंवा वाहन वळविण्यास पुरेशी जागा न मिळा

ल्याने कोंडी देखील होते. सकाळ संध्याकाळ रिक्षा, दुचाकी, चारचाकी सर्व वाहनांची वर्दळ या भागात असते अशा वेळी अपघातांची शक्यता असते. वाहनांची धडक तर या ठिकाणी होतच असते.

सायली राणे, वाहन चालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.