Mumbai Rode News: मुंबईजवळील गावांचा वनवास संपणार ; मिळणार हक्काचे रस्ते !

Mumbai-Pune Expressway News
Mumbai-Pune Expressway News
Updated on

Mumbai Rode News: उरण तालुक्यातील जसखार, सोनारी, करळ तसेच सावरखार या चार गावांना जोडणारा रस्ता जेएनपीए बंदरातील मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेमुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांतील नागरिकांना रेल्वेलाईन ओलांडण्याचा धोका पत्करावा लागत होता. त्यामुळे गेली कित्येक वर्षे चारही गावांच्या ग्रामस्थांकडून पादचारी पुलाची मागणी केली जात होती. अखेर ही मागणी जेएनपीए प्रशासनाने मान्य केली असल्याने चारही गावांचा वनवास संपणार आहे.

सोनारी, सावरखार, जसखार, करळ या चारही गावांच्या जमिनी जेएनपीए प्रकल्पासाठी संपादित झाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त म्हणून या गावांची गणना होत आहे. अशातच जेएनपीए बंदरात मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेमुळे सोनारी, करळ, सावरखार या तीन गावांतील ग्रामस्थांना जसखार गावात जाण्यासाठी किंवा जसखार गावातील ग्रामस्थांना या तीन गावांत येण्यासाठी धोकादायक अशी रेल्वे मार्गिका ओलांडावी लागत होती.

Mumbai-Pune Expressway News
Mumbai News: मुंबई होणार चकाचक; शहर अतिक्रमण मुक्त करण्याचे महापालिकेचे मिशन

तर नातेवाईकांना तसेच देवदर्शनासाठी अनेकदा ग्रामस्थांना हा धोका पत्करताना जीवही गमवावा लागला होता. त्यामुळे चारही गावांतील ग्रामस्थांनी जेएनपीएकडे या गावांना जोडणारा पादचारी पूल व्हावा, अशी मागणी केली होती. अखेर जेएनपीए प्रशासनाच्या माध्यमातून हा पादचारी पूल बांधण्याला मान्यता देण्यात आली आहे.

Mumbai-Pune Expressway News
Mumbai Ahmedabad Bullet Train: मोठी बातमी : बहुचर्चित बुलेट ट्रेनच्या कामाला मुंबईत सुरुवात !

उभारणीसाठी दोन वर्षांचा कालावधी

जेएनपीएच्या माध्यमातून जसखारला या गावापासून करळ, सोनारी, सावरखार या गावांना जोडणारा पादचारी पूल झाल्यावर नागरिकांना धोकादायक अशी रेल्वे मार्गिका ओलांडावी लागणार नाही. तसेच चारही गावांतील नागरिकांना सहज ये-जा करता येणार असल्याने विकासालाही चालना मिळणार आहे. यासाठी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर हा पादचारी पूल बांधण्यात येणार असून त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागण्याची माहिती जेएनपीए प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Mumbai-Pune Expressway News
Mumbai News : बॉम्बे डाईंग कंपनीची २२ एकर जमीन ५ हजार २०० कोटींना विकण्याचा निर्णय

जेएनपीएच्या रेल्वे मार्गिकेमुळे गेली कित्येक वर्षे या चारही गावांतील ग्रामस्थ धोकादायक रित्या ये-जा करीत आहेत. त्यामुळे हा पादचारी पूल झाला तर खरोखरच नागरिकांचा त्रास वाचणार आहे.

- आनंद कडू, ग्रामस्थ

Mumbai-Pune Expressway News
Mumbai Crime : धक्कादायक! मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.