Sextortion Mumbai:मुंबईत सेक्सटॉर्शनचा आणखी एक बळी ! फेसबुकवरुन महिलेशी मैत्री, एका व्हिडीओ कॉलनंतर गमावले ४३ लाख

Sextortion Mumbai:मुंबईत सेक्सटॉर्शनचा आणखी एक बळी ! फेसबुकवरुन महिलेशी मैत्री, एका व्हिडीओ कॉलनंतर गमावले ४३ लाख

ज्ञात टोळीने कोपरखैरणेत राहणाऱ्या एका ३४ वर्षीय व्यक्तीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमावर अपलोड करण्याची भीती दाखवून तब्बल ४३ लाख २२ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Published on

Sextortion Case Mumbai: अज्ञात टोळीने कोपरखैरणेत राहणाऱ्या एका ३४ वर्षीय व्यक्तीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमावर अपलोड करण्याची भीती दाखवून तब्बल ४३ लाख २२ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात टोळीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणातील ३४ वर्षीय तक्रारदार व्यक्ती कमल (बदललेले नाव) कोपरखैरणेत राहण्यास असून गत मे महिन्यामध्ये कमलसोबत खुशी मलिक नावाच्या महिलेने फेसबुकवरून मैत्री केली. त्यानंतर या दोघांचा व्हॉट्‍सॲपवरून संवाद सुरू झाला. या दरम्यान १८ मे रोजी खुशी मलिक हिने व्हिडीओ कॉल करत कमलसोबत अश्लील संभाषणास सुरुवात केली.

त्यानंतर खुशी मलिक हिने विवस्त्र होत, कमललादेखील विवस्त्र होण्यास भाग पाडले. यादरम्यान खुशी मलिक व तिच्या सहकाऱ्यांनी कमलचे नग्नावस्थेतील व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतले. यानंतर तासाभरातच सदर टोळीतील एका सदस्याने दिल्ली येथील पोलिस अधिकारी असल्याचे भासवीत कमलकडे व्हिडीओ डिलीट करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या कमलने त्याला पैसे पाठवून दिले.

त्यानंतरही धमकी देत या टोळीने कमलकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर यूपीआय, आरटीजीएसद्वारे तब्बल ४३ लाख २२ हजार रुपये उकळले. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच कमलने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. (Latest Marathi News)

Sextortion Mumbai:मुंबईत सेक्सटॉर्शनचा आणखी एक बळी ! फेसबुकवरुन महिलेशी मैत्री, एका व्हिडीओ कॉलनंतर गमावले ४३ लाख
Smart Information :ऑनलाइन अपॉइंटमेंटमुळे दीड लाखाचा फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.