Mumbai : अखेर जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांचा विजय

श्री गणेश मंदिर संस्थानच्या विश्वस्त पदाची निवडणूक
Mumbai
Mumbaisakal
Updated on

डोंबिवली : डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानची विश्वस्त पदाची निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली. यामध्ये 10 जागांसाठी 13 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यामध्ये जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांचा विजय झाला असून नविन उमेदवारांना अल्प मत पडल्याने त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. विजयी उमेदवारांना 500 च्या वत मत पडली असून आता त्यांच्यातून अध्यक्ष निवडला जाईल याची प्रक्रिया लवकरच पार पडेल असे संस्थानकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे गणेश मंदिर संस्थान शतकोत्तर महोत्सवाकडे वाटचाल करत असल्याने या वर्षाचा अध्यक्षपदाचा मान हा महत्त्वाचा असून ती अध्यक्ष पदाची धुरा आपल्या गळ्यात पडावी यासाठी काही विश्वस्त डोळा लावून बसले आहेत.

डोंबिवलीचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे श्री गणेश मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सन 1924 ला मंदिराची स्थापना झाली असून मंदिर हे केवळ देवस्थान म्हणून न ठेवता सामाजिक, वैद्यकीय, आरोग्य, स्वच्छता, शालेय, दुष्काळग्रस्त, पूरग्रस्तांना मदत असे अनेक उपक्रम संस्थानतर्फे दरवर्षी राबविण्यात येतात. मंदिराचे यंदाचे 98 वे वर्ष सुरु असून लवकरच शंभरावे वर्ष मंदिर साजरा करणार आहे. मंदिर आता शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करत असताना संस्थानची 2022 ते 2027 या कालावधीची विश्वस्त पदाची निवडणूक देखील तितकीच महत्त्वाची होती. गणेश मंदिर विश्वस्त पदावर 11 सदस्य आहेत

विश्वस्त पदासाठी बिनविरोध निवड व्हावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले. पण संजय दामले, संतोष काळे, सचिन कटके यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीशिवाय पर्याय राहिला नाही. रविवारी ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. रविवारी सकाळी 8.30 ते 12.30 अशी वेळ सदस्यांना मत देण्यासाठी ठेवण्यात आली होती. संस्थानचे एकूण 5 हजार सदस्य आहेत. परंतू यातील काही सदस्य हे स्थलांतरीत झाले आहेत, तर काही सदस्यांचा मृत्यु झाला आहे. यामुळे प्रत्यक्ष मतदानासाठी 800 च्या आसपास सदस्य उपस्थित असतात असे आधीच सुत्रांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार रविवारी 733 मतदारांनी आपली मते नोंदविल्याचे पहायला मिळाले.

विश्वस्तांमधील जुने जाणते डॉ. अरुण नाटेकर, नीलेश सावंत, शिरिष आपटे यांच्या जागेवर कुलकर्णी ब्रदर्स चे श्रीपाद कुलकर्णी, डाॅ. उत्कर्ष भिंगारे, आनंद धोत्रे यांची वर्णी लागली असून

त्यांना चांगले मतदान झाले आहे. तसेच विश्वस्त दिवंगत अच्युतराव कऱ्हाडकर यांच्या जागेवर वैद्य विनय वेलणकर यांना स्थान देण्यात आले आहे. विजयी विश्वस्तांची 2027 पर्यंत कार्य कालावधी असणार आहे. विश्वस्त पदावरील एक जागा महिलांसाठी राखीव आहे. या जागेवर गौरी खुंटे यांची आधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

रविवारी पार पडलेल्या निवडणूकीत राजय कानिटकर यांना सर्वाधिक म्हणजे 611 मते मिळाली आहेत. तर मंदार हळबे यांना 610 मते पडल्याने त्यांना दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले. तर तिसऱ्या स्थानी विनय वेलणकर यांना 598 मते पडली आहेत. जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांविरोधात नवे चेहरे असलेले संतोष काळे यांना सर्वात कमी 176 मते, संजय दामले यांना 190 तर सचिन कटके यांना 205 मते मिळाली आहेत.

विजयी उमेदवार

राजय कानिटकर - 611

मंदार हळबे - 610

विनय वेलणकर - 598

सुहास आंबेकर - 597

श्रीपाद कुलकर्णी - 597

अलका मुतालिक - 576

प्रवीण दुधे - 570

उत्कर्ष भिंगारे - 552

आनंद धोत्रे - 535

पराभव झालेले उमेदवार

सचिन कटक - 205

संजय दामले - 190

संतोष काळे - 176

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.