Mumbai : "छोटी युक्ती, प्रदूषणमुक्ती; एका निर्णयाने ८३ टक्के प्रदूषण घटले

Mumbai
Mumbai
Updated on

मुंबई : फरशी पुसण्याच्या लिक्विडची एक लिटरची बाटली विकण्याऐवजी गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सने केवळ त्यातला काँन्संट्रेटेड जेलचा सॅशे विक्रीस ठेऊन ग्राहकांना तो घरी नेऊन त्यात पाणी घालून अर्धा लीटर फ्लोअर क्लिनर तयार करण्यास सांगितले. या छोट्या युक्तीमुळे ९४ टक्के प्लास्टिक वापर, ८३ टक्के इंधन वापर, ७२ टक्के कागद वापर कमी होऊन कार्बनचे उत्सर्जनही ८३ टक्के कमी झाले.

Mumbai
गोड्या पाण्याच्या प्रकल्पाचा खारपाणपट्ट्याला होणार लाभ; गडकरींकडून प्रोजेक्टची पाहणी

फरशी पुसण्याच्या एक किलोच्या फ्लोअर क्लीनर बाटलीमध्ये एक लिटर तयार द्रावण असते. गोदरेज ने त्याऐवजी रेडी टू मिक्स सॅशेमधून जेल स्वरूपात याचे तीव्र स्वरूपातील मिश्रण दिले. ते घरी नेऊन ग्राहकांना त्यात दहापट पाणी मिसळून अर्धा लिटर फ्लोअर क्लीनर तयार करायला सांगितले. या छोट्याशा युक्तीमुळे गोदरेजच्या उत्पादनातील प्लास्टिकचा वापर कमी झाला. बाटलीचे वजन आणि आकार कमी झाल्यामुळे एक ट्रक सहा पट जास्त फ्लोअर क्लीनर ची वाहतूक करू लागला.

Mumbai
Ashadhi Wari : पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस! ५००० विशेष बसेस सोडणार

त्यामुळे ८३ टक्के इंधन बचत झाली आणि ८३ टक्के कार्बन उत्सर्जनही व प्रदूषणही कमी झाले. तसेच गोदरेजचे पॅकिंग मधील ९४ टक्के प्लास्टिक व ७२ टक्के कागदही कमी झाला. अशाप्रकारे एका छोट्या युक्तीमुळे पर्यावरणाचा एवढा फायदा झाल्यामुळे अशा छोट्या छोट्या युक्तींचा वापर सर्वांनीच करावा आणि स्वच्छ पर्यावरणाला हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे रेडी टू मिक्स फ्लोअर क्लीनर फक्त ५५ रुपयांच्या कॉम्बिपॅक मध्ये मिळते आणि याचे वेगळे रिफील सॅशेही चाळीस रुपयात मिळते. या स्वतंत्र पॅक मुळे फ्लोअर क्लीनर ची किंमतही एक तृतीयांश कमी झाली, तसेच त्याने पर्यावरण रक्षणासही मोठा हातभार लावला, असे गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट लि. चे अश्विन मूर्ती म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()