Mumbai : एनईपी घरोघरी; उपक्रमाचा राज्यभरात प्रभाव; सोलापूर विद्यापीठातील उपक्रमाची राज्यभरात चर्चा

एनईपी घरोघरी या उपक्रमाचे गावखेड्यांपासून शहरातील नागरिकांकडून या दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.
Mumbai
MumbaiSakal
Updated on

मुंबई - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती राज्यातील प्रत्येक नागरीकांना सहजपणे कळावी यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घरोघरी (एनईपी घरोघरी) या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने सुरू केलेल्या उपक्रमांची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

एनईपी आणि त्यासाठीची माहिती सर्वसामान्यांना अगदी सहजपणे कळावा, त्याचे महत्व लक्षात यावे यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याने त्याची अंमलबजावणी आता इतर विद्यापीठांमध्ये करण्याची चर्चा विभागात सुरू झाली आहे.

Mumbai
Mumbai News : मुंबईकरांनो मच्छरांपासून सावधान ; मलेरिया डेंग्यूच्या रुग्ण संख्येत होत आहे वाढ !

एनईपीला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये एनईपीची माहिती मिळावी यासाठी एनईपी घरोघरी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

यासाठी खास व्हॅन तयार करण्यात आली असून ती विद्यापीठाच्या कार्यकक्षेत असलेल्या गावांमध्ये जाऊन नागरिकांना माहिती देण्याचे काम करत आहे.

एनईपी घरोघरी या उपक्रमाचे गावखेड्यांपासून शहरातील नागरिकांकडून या दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. लोकांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबतची उत्सुकता असल्याने या दिंडीबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी लोक स्वारस्य दाखवत आहेत. यात असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू, डॉ. रजनीश कामत यांनी दिली.

Mumbai
Solapur : कामानिमित्त घरी येणारा तरुणच निघाला चोरटा; १२ तोळे दागिने हस्तगत

नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याची माहिती ग्रामीण भागामध्ये पोहोचण्यासाठी अत्यंत चांगला उपक्रम या विद्यापीठाने सुरू केला आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना यातून माहिती मिळण्यास मोठी मदत होत असून हा उपक्रमच एकूण खूप स्वागतार्ह आहे.

- डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, (अध्यक्ष: नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी वैयक्तिकृत शिक्षण आराखडा समिती )

असे आहेत वैशिष्ट्ये

- २६ जूलै रोजी या उपक्रमाला सुरूवात, ७० हून अधिक गावांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम पूर्ण

- एनईपी घरोघरी या उपक्रमातून थेट ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती उपलब्ध

- ग्रामपंचायतीत होणाऱ्या कार्यक्रमात सदस्य आणि गावकरी यांचा मोठा सहभाग

- महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये एनईपीसाठी प्रभावी जाणीवजागृती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.