मुंबई - पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक होण्याच्या घटना ताज्या असतानाच आता मुंबई-सोलापूर मार्गावर धावणार्या’वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. दगडफेकीची घटना पुण्यात घडली असून रेल्वे सुरक्षा दल सतर्क झाले आहे.
मध्य रेल्वेवर सीएसएमटी- शिर्डी आणि सीएसएमटी-सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रुवारी २०२३ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आली. या दोन्ही एक्सप्रेसला प्रवाशांच्या तुफान प्रतिसाद मिळत आहे.
मात्र, मुंबई -सोलापूर सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी सोलापूरच्या वंदे भारत ट्रेन पुणे स्थानकातून पुढे निघताच दगडफेकीची घटना घडली आहे. यामध्ये गाडीची काच फुटली आहे. मात्र सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी दगडफेक करणार्यांचा रेल्वे पोलीसांकडून शोध घेतला जात आहे. याआधीही पुणे येथील शिवाजीनगर परिसरातून वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाली होती. या दगडफेकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे रुळालगत गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.