Mumbai - डोंबिवलीतील कोपर रोड भागातील सिद्धार्थनगर येथील घराच्या जिन्यात वीजप्रवाह उतरल्याने मंगळवारी रात्री मांगीलाल मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
घटनास्थळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पथदिव्यांसाठीची केबल लोखंडी जिन्याला चिकटल्याचे निदर्शनास आले असून या अपघातात महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचा कोणताही दोष नसल्याचे स्पष्टीकरण महावितरणने दिले होते.
यावर आता केडीएमसी ने देखील विद्युत निरिक्षक यांचे समक्ष चाचणी करत पथदिवेचे सर्व्हिस वायर तात्रिकदृष्टया दोषरहित असल्याचे स्पष्ट केले आहे. मांगीलाल मोरे यांच्या मृत्यू नंतर नागरिकांनी रास्ता रॉक करत या घटनेचा निषेध नोंदवला.
यानंतर महावितरण व केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. घटनास्थळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पथदिव्यांसाठीची केबल लोखंडी जिन्याला चिकटल्याचे निदर्शनास आले.
असून या अपघातात महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचा कोणताही दोष नसल्याचा दावा महावितरण ने केल्यानंतर केडीएमसी ने देखील विद्युत निरिक्षक यांचे शाखा अभियंता, महावितरणचे सहायक अभियंता व महापालिकेचे उप अभियंता (विद्युत) यांच्या समक्ष घटनास्थळी पाहणी केली.
तांत्रिक तपासणी व चाचणी घेतली असता पथदिवेचे सर्व्हिस वायर तात्रिकदृष्टया दोषरहित असल्याचे आढळून आले. तसेच पथदिवे सर्व्हिस वायरला विज पुरवठा करून विद्युत प्रवाहाची चाचणी घेतली असता सर्विस वायरला कुठेही शॉक येत नसल्याचे आढळून आले असल्याचे केडीएमसीने म्हटले आहे. तसेच महावितरण चा दावा हा दिशाभूल करणारा असल्याचे देखील म्हटले आहे.
महावितरणने 13 जून रोजी घटना घडल्यानंतर तात्काळ महापालिकेस कळविणे आवश्यक होते. परंतु, महावितरणकडून महापालिकेस सदर घटनेबाबत कळविणेत आले नाही. सुमारे अकरा तास उलटल्यानंतर विद्युत निरिक्षक विभागाकडून महापालिकेचे उप अभियंता (विद्युत) ज्याना कळविण्यात आले.
त्यामुळे सदर घटनेबाबत साशंकता वाटते. सदर घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी महावितरणचा लोखंडी पोल असून पोलवरील ग्राहकांच्या सर्व्हिस वायर अत्यंत धोकादायक व जीर्ण स्वरुपात आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी सतत शॉर्ट सर्किट बाबतच्या तक्रारी उद्भवत असल्याने तेथील स्थानिक नागरीकांनी महापलिकेस माहिती दिली आहे.
दर पावसाळ्यापूर्वी 3 महिने आधी प्रभागनिहाय तांत्रिक पथके तयार करून महापालिका क्षेत्रातील पथदिवे पोल व यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या तपासण्यात येते व सुरक्षिततेबाबत उपाययोजना महापालिकेकडून केली जाते.
सदर घटना स्थळी असलेल्या पथदिवे पोलच्या सर्विस वायरचा लाईव्ह डेमो घेतला असता सदर वायर मधुन विज प्रवाह लिकेज होत नाही हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे सदर अपघात महापालिकेच्या पथदिव्यामुळे झालेला नाही असे केडीएमसीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.