Mumbai : विद्यार्थिनीचा पाठलाग करत, रस्त्यातच तिच्यावर अत्याचार; महिलांचा आक्रोश

आरोपीच्या हातात पोलिसांच्या बेड्या असतानाही आरोपी हास्य करत पत्रकारांना व्हिक्टोरी चिन्ह दाखवत हातवारे
Mumbai
MumbaiSakal
Updated on

डोंबिवली - कॉलेज वरुन घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करत रस्त्यात तिला गाठून रस्त्यावरच तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची निंदनिय घटना कल्याण परिसरात बुधवारी सायंकाळी घडली.

कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी विशालला अटक केली असली तरी गुन्हा दाखल होण्यास मात्र विलंब लागला.

Mumbai
Mumbai : काँग्रेसच्या मेणबत्ती मोर्चाप्रकरणी गुन्हा दाखल; वर्षा गायकवाड, निरुपम, नसीम खान यांचा समावेश...

दरम्यान आरोपीच्या हातात पोलिसांच्या बेड्या असतानाही आरोपी हास्य करत पत्रकारांना व्हिक्टोरी चिन्ह दाखवत हातवारे केले.

महिन्याभरापूर्वी अंबरनाथ मध्ये पोलिस स्टेशनच्या आवारात पोलिसांसमोर पत्रकारांवर दगड भिरकावला ची घटना घडली होती.

या घटना पाहता गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिलेले नसून शहरांत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Mumbai
Mumbai-Thane Vertical University : मुंबई, ठाण्यात आता व्हर्टिकल विद्यापीठ

कल्याण पूर्वेतील एक अल्पवयीन मुलगी क्लास वरुन घरी परतत असताना विशाल गवळी या गुन्हेगाराने दुचाकीवरुन तिचा पाठलाग केला. रस्त्यावर तिला गाठून खाली पाडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न विशालने केला. दरम्यान मुलीने स्वतःच आरोपीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या तावडीतून तिची सुटका करुन घेत घर गाठले.

यानंतर पालकांनी मुलीसह पोलिस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी विशालला अटक केली.

मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला. पोलिसांनी विशालला अटक केली असता पत्रकार त्याचे चित्रण करत असताना विशालने त्यांना व्हिक्टोरी चिन्ह दाखवत हास्य केले.

Mumbai
Pune News : नदी काठ सुधार प्रकल्प; वृक्षतोडी विरोधातील याचिका निकाली

पोलिसांच्या हातात बेड्या पडलेल्या असतानाही आरोपींची ही हिंमत होत असल्याने या घटनेवर समाज माध्यमातून तीव्र पडसाद उमटत आहेत. रात्री उशीरा विशाल याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी बलात्कार, विनयभंगाचे पोक्सो अंतर्गत गुन्हे तसेच चोरी व लुटीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच तडीपारीची कारवाई देखील त्याच्यावर करण्यात आली होती. याप्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली.

Mumbai
Pune News : अखेर सिंहगड परिसरातील आदिवासी कातकरी नागरिकांना मिळाले जातीचे दाखले

विशाल याचे वर्तन पाहता त्याला कायद्याचे भय नाही असेच काहीसे त्याच्या हावभावावरुन दिसून येत होते. विशाल हा कल्याण मधील एका राजकीय नेत्याच्या नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. विशाल हे सर्व वागत असताना पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Mumbai
Pune : डी.एल.एड अभ्यासक्रमाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागांसाठी विशेष फेरी जाहीर

पोलिसांनी त्याला हातवारे करुच कसे दिले त्यानंतर त्याच्यावर कारवाई का केली नाही असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

महिनाभरापूर्वी अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून सराईत गुन्हेगार जितेंद्र उर्फ टायगर पवार या गुन्हेगारास कारागृहात हलवण्यात नेत असताना त्याने पत्रकारांवर दगड भिरकावून मारत त्यांना शिविगाळ केल्याची घटना घडली होती.

त्यावेळी ही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. गुन्हेगारांचे हे वर्तन पाहता त्यांना पोलिसांचा धाक राहीलेला नाही असेच काहीसे दिसून येते.

महिला स्वच्छतागृहांचा मुद्दा ऐरणीवर

सायंकाळी पिडीत मुलगी घरी येत असताना तिला लघुशंका आलेली असल्याने तिने नेहमीचा रस्ता सोडून शॉर्टकट मारुन घरी परतायचे ठरविले. तो रस्ता फार रहदारीचा नाही. विशाल हा तिच्यावर आधीपासूनच पाळत ठेवून होता. मुलीने रस्ता बदलताच विशालने यू टर्न मारुन त्या रस्त्यावर गेला.

Mumbai
Mumbai-Thane Vertical University : मुंबई, ठाण्यात आता व्हर्टिकल विद्यापीठ

तेथे मुलीला पकडून कोपऱ्यात नेऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेत घरी येऊन पालकांना याची माहिती दिल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

पाच वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पिडीत मुलीचे कुटूंब पोलिस ठाण्यात बसून होते. परंतू गुन्हा दाखल झाला नव्हता. रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. ही घटना पाहता महिलांसाठी स्वच्छतागृहांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

स्वच्छतागृह जवळपास नसल्याने महिला मुलींना अशा अनोळखी रस्त्याचा आडोसा घ्यावा लागतो. त्यांच्यावर उद्या जबरदस्ती झाली तर त्यास जबाबदार कोण हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

Mumbai
Pune : दहशतवादी प्रकरणात ‘एटीएस’कडून पुण्यात पाचव्या आरोपीला अटक

ठाकरे गटाच्या महिला आक्रमक

कल्याण पूर्वेत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण मधील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कोळसेवाडी पोलिसांची भेट घेत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

गाव गुंडांवर पोलिसांचा वचक राहिला नाही, गुन्हेगारी रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी केला.

महिलांवर होणाऱ्या अत्याचार बाबत त्यातील आरोपींना कठोर शिक्षा करावी. पोलिस ठाण्यातील त्यांचे वर्तन पाहता शहरातून त्यांची धिंड काढावी अशी मागणी देखील केली.

महिलांवरील अत्याचार रोखले गेले नाहीत तर ठाकरे गटातील महिला येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशारा या महिलांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.