मुंबई : सध्या राज्यात आणि देशभरात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना डेंग्यू आणि चिकनगुण्याचे सुद्धा सक्रिय रूग्ण राज्यात आढळून येत आहेत. त्याचबरोबर आता मुंबईत स्वाईन फ्ल्यूने सुद्धा डोकं वर काढलं असून शहरात स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. आत्तापर्यंच मुंबईत ११ रूग्णांची नोंद झाली असून पावसाळ्यात अशा साथीच्या रोगांचा संसर्ग जास्त प्रमाणात पसरतो यासाठी डॉक्टरांनी काळजी घेण्याचे अवाहन केले आहे.
(Mumbai Swine Flu Updates)
राज्याच सध्या पावसाळ्यामुळे सर्दी, खोकला, ताप, मलेरिया यांसारख्या आजारांसहित स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढत आहे असं मत डॉक्टरांनी नोंदवलं आहे. मुंबईत सध्या स्वाईन फ्ल्यूचे चार रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे लोकांनी 'एन्फ्लूएन्झा एच1 एन1' ची चाचणी करावी असं अवाहन केले गेले आहे. मागच्या तीन वर्षात H1N1च्या एकाही रूग्णाची नोंद करण्यात आली नव्हती. त्यानंतर मागच्या दोन वर्षात जवळपास १०८ रूग्णांची नोंद झाली होती. तर मागच्या आठवड्यात स्वाईन फ्ल्यूच्या एका रूग्णाचा मृत्यू झाला होता.
काय आहेत स्वाईन फ्ल्यूची लक्षणे ?
सर्दी होणे, खोकला येणे, ताप येणे, नाकातून पाणी गळणे ही लक्षणे स्वाईन फ्ल्यूचे असून कोरोना आणि स्वाईन फ्ल्यूचे लक्षणे जवळपास सारखेच आहेत. त्यामुळे या दोन्ही आजारांना ओळखणे कठीण जात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर कोरोना आणि H1N1 अशा दोन्हीही चाचण्या करण्याचे अवाहन करण्यात येत आहे.
काय घ्यावी काळजी?
कोरोनासाठी ज्या प्रकारे आपण काळजी घेतो त्याप्रकारेच स्वाईनफ्ल्यू साठी काळजी घेतली पाहिजे असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. हात स्वच्छ धुणे, स्वच्छता राखणे, मास्कचा नियमितपणे वापर करणे अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.