Mumbai Temperature: मुंबईकरांनो सावधान! उष्णतेपासून वाचण्यासाठी 'हा' सरकारला वेक अप कॉल, नाहीतर...

Mumbai Temperature: २०२३ मध्ये आपण जागतिक उष्णतेचा विक्रम मोडीत काढला आहे. मात्र आता २०२४ च्या सुरवातीलाच धक्कादायक बातमी समोर आली आहे. वेगात होणारे काँक्रिटीकरण आणि शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या शहरी उष्णतेचे व्यवस्थापन करण्यासाठी शहराचा खर्च २०५० मध्ये १६६ टक्क्यांनी वाढणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
Mumbai Temperature
Mumbai TemperatureSakal
Updated on

Mumbai Temperature: २०२३ मध्ये आपण जागतिक उष्णतेचा विक्रम मोडीत काढला आहे. मात्र आता २०२४ च्या सुरवातीलाच धक्कादायक बातमी समोर आली आहे. वेगात होणारे काँक्रिटीकरण आणि शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या शहरी उष्णतेचे व्यवस्थापन करण्यासाठी शहराचा खर्च २०५० मध्ये १६६ टक्क्यांनी वाढणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. नवीन आंतरराष्ट्री अभ्यासात म्हटलं आहे की वाढती उष्णता लोकांच्या आरोग्यावर, उत्पादकता आणि आर्थीक गोष्टींवर प्रभाव पाडू शकते. एअर कंडीशनचा देखील वापर वाढू शकतो, असे देखील अभ्यासात म्हटले आहे.

मुंबई, न्यूयॉर्क, पॅरिस आणि रिओ डी जनेरियोच्या मुडीज आरएमएस या जोखीम व्यवस्थापन कंपनीने केलेल्या केस स्टडीनुसार, एक जोखीम व्यवस्थापन कंपनी जी जोखीम-व्यवस्थापन उपाय तयार करून नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या जोखमींचे मूल्यमापन आणि व्यवस्थापन करण्यात मदत करते. त्यानुसार शहराच्या मध्यभागाच्या तुलनेत कमी घनतेसह उपनगरीय स्थानाचे परीक्षण करताना मुंबईच्या वर्षानुवर्षे उष्णतेपासून जोखीम कमी करण्याच्या खर्चात १२६ टक्क्यांनी वाढ होईल.

पायाभूत सुविधांमध्ये बदल केला पाहीजेय. यामध्ये गुंतवणूक केल्यास उष्णतेच्या घटनांचे परिणाम आणि त्यांचे आर्थिक परिणाम लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात. गडद आणि डांबरी रस्ते, गडद छत, इमारती आणि कचरा, झाडांचा अभाव आणि अभेद्य पृष्ठभाग यामुळे शहरी भागात उष्णता वाढू शकते, असे अभ्यासात म्हटले आहे.

Mumbai Temperature
Loksabha Election : बेळगावातून सतीश जारकीहोळी, चिक्कोडीतून कोण? लोकसभेसाठी 14 काँग्रेस उमेदवारांची यादी व्हायरल

रेस्पायर लिव्हिंग सायन्सेसचे संस्थापक, हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण आणि विश्लेषण करणारे व्यासपीठ, रोनक सुतारिया म्हणाले, “चार शहरांपैकी, मुंबईच्या नागरी पायाभूत सुविधांचा विकास, ज्यामध्ये मेट्रो, कोस्टल रोड आणि इमारतींच्या पुनर्विकासातून सिमेंट आणि काँक्रिटीकरणाचा समावेश हे उत्सर्जनात भर घालणार आहे. हे सर्व हे र्व इतर शहरांमधील शहरी पायाभूत सुविधांच्या उत्सर्जनाला मागे टाकेल. त्यामुळे यासाठी होणारा खर्च १६६ टक्क्यांनी वाढणार आहे. हा एक वेक-अप कॉल असावा आणि त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. (Latest Mumbai News)

Mumbai Temperature
Supreme Court: "आरक्षणाचा लाभ मिळालेल्या जातीला बाहेर काढलं पाहिजे"; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.